Toyota Kirloskar Motor आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीमध्ये सामंजस्य करार, ग्रीन हायड्रोजन मिशनला चालना
या करारांतर्गत टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली हायड्रोजन फ्यूएल-सेल इलेक्ट्रिक कार Toyota Mirai एनआयएसईकडे सुपूर्द केली आहे. भारतातील विविध हवामान, रस्ते आणि वाहतूक परिस्थितींमध्ये या वाहनाची प्रत्यक्ष चाचणी व कामगिरीचे सविस्तर मूल्यांकन करण्यात येणार आहे.
Hyundai च्या ‘या’ कारला दणादण खरेदी करताय ग्राहक! थेट बनली कंपनीची Best Selling Car
एनआयएसईकडून टोयोटा मिराईचे इंधन कार्यक्षमता, प्रत्यक्ष रेंज, ड्रायव्हिंग क्षमता, रिफ्युएलिंग प्रक्रिया, थंड व उष्ण हवामानातील कामगिरी तसेच पर्यावरणीय टिकाऊपणा या घटकांवर अभ्यास केला जाणार आहे. यासोबतच भारतातील रस्ते पायाभूत सुविधा, धुळीचे प्रमाण आणि विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये वाहन कितपत अनुकूल ठरते, याचीही तपासणी होणार आहे.
हा सामंजस्य करार केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, MNRE सचिव संतोष कुमार सारंगी, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचे संचालक अभय बकरे, NISE चे महासंचालक डॉ. मोहम्मद रिहान, तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी विक्रम गुलाटी आणि सुदीप दळवी यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, भारताचा शुद्ध ऊर्जेकडे होणारा प्रवास आता धोरणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल करत आहे. टोयोटा आणि एनआयएसई यांच्यातील हा करार देशाची ऊर्जा स्वावलंबन आणि कार्बन-न्यूट्रल उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरेल.
Maruti Grand Vitara चा टप्यात कार्यक्रम! 28.65 Kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ SUV ने मार्केट खाल्लं
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ अधिकारी सुदीप दळवी यांनी सांगितले की, भारतातील प्रत्यक्ष चाचण्यांमुळे हायड्रोजन फ्यूएल-सेल तंत्रज्ञानाच्या क्षमतेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. तर विक्रम गुलाटी यांनी टोयोटाच्या बहु-मार्ग (Multi-Pathway) धोरणावर भर देत, हायड्रोजन, बॅटरी इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि पर्यायी इंधन तंत्रज्ञानाद्वारे भारताच्या शाश्वत भविष्याला पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली.






