(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लग्नानंतर मुलगी सासुरवाशीण, आणि माहेरी गेल्यावर माहेरवाशीण — या दोन टोकांच्या चक्रात अडकून असंख्य मुलींच्या आयुष्यात एक वेदनादायक वास्तव उभं राहतं. समाजात अजूनही सासरचं घर नवऱ्याच्या नावावर आणि माहेरचं घर भावाच्या नावावर मानलं जातं. या दोन्ही घरांमध्ये ये-जा करत राहणाऱ्या मुलीला स्वतःचं घर मात्र नावालासुद्धा राहत नाही, ही वस्तुस्थिती अनेकांना बोचू लागते.
याच सामाजिक वास्तवावर अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने थेट भाष्य केले आहे. अभिनेत्री अलिकडेच एका मुलाखतीत या वस्तुस्थितीवर स्पष्ट बोलताना दिसली, तिने नव्या पॉडकास्टमधून थेट आणि प्रभावी भाष्य केले आहे. मुलीच्या अस्थिरतेवर, तिच्या ‘घर’ या भावनिक आणि सामाजिक हक्कावर प्राजक्ताने उपस्थित केलेले प्रश्न प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात.अनेकांना विचार करायला भाग पाडणारे मुद्दे तिने मांडले आहेत.
प्राजक्ताची हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिचे कौतुक देखील केले आहे.एका युजरने कमेंट केली, ”किती सहज सुंदर स्पष्ट विचार मांडलेत”, तर दुसऱ्याने लिहिले आहे, ”हो हे खरे आहे’, अश्या अनेक कमेंट्स तिच्या व्हिडिओला येत आहेत.यातील तिची स्पष्टवक्तेपणा, समाजातील पद्धतींवर केलेलं निरीक्षण आणि महिलांच्या वस्तुस्थितीवर दिलेला आवाज यामुळे हा पॉडकास्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावरही या विषयाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद उमटत आहे. अनेक महिलांनी प्राजक्ताच्या मताशी सहमती दर्शवत, “हो, हे आमचं वास्तव आहे,” अशा प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.प्राजक्ता हनमघरचा हा नवा अंदाज प्रेक्षकांसाठी तितकाच धक्कादायक आणि विचार करायला लावणारा ठरत आहे.
प्राजक्ता हनमघर ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.सोशल मीडियावरही प्राजक्ता सक्रिय असून तिच्या विचारप्रधान कंटेंटमुळे आणि पॉडकास्ट्समुळे ती सतत लोकांच्या चर्चेत असते.प्राजक्ताचा अभिनय प्रवास टेलिव्हिजनपासून सुरू झाला. ती Fu Bai Fu, Comedychi Bullet Train यांसारख्या शोमध्येही झळकली आहे. चित्रपटांमध्येही तिने आपला ठसा उमटवला. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या Ata Thambaycha Naay! या चित्रपटात भूमिका साकारली आहे.






