फोटो सौजन्य - Social Media
विभागातील काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, तहसील कार्यालयातील शिक्षक मतदार नोंदणी अधिकारी यांनी चुकीचे मार्गदर्शन करून नोंदणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. तसेच स्वयंअर्थसहायीत इंग्रजी माध्यमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा अधिकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे विभागातील काही तहसील कार्यालयामध्ये स्वयंअर्थसहायीत इंग्रजी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकानी शिक्षकांचे फॉर्म नंबर १९ मतदार नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी अर्ज नाकारले.दरम्यान, ५ सप्टेंबर २०१६ च्या सुधारित सूचनेनुसार शिक्षक मतदार संघात शिक्षक रहिवासी असावा. त्याने पात्रता तारखे पूर्वीच्या ६ वर्षांच्या आत एकूण किमान ३ वर्षाच्या कालावधीसाठी शैक्षणिक संस्थामध्ये अध्यापनाचे काम केलेले असावे.
राज्यातील शैक्षणिक संस्था माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जाच्या नसतील अशा मार्गदर्शक सूचना असतानाही विभागातील तहसील कार्यालयातील मतदार नोंदणीअधिकाऱ्यांनी विनानुदानित, कायम विनानुदानित, स्वयंअर्थसहायीत इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे मतदार नोंदणी अर्ज स्वीकारले नाहीत. त्यामुळे सदर शिक्षक अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मतदान करण्यापसून वंचित राहतील असा आक्षेप नोंदविला होता.
त्यामुळे आयुक्त तथा शिक्षक मतदार नोंदणी अधिकारी यांनी आक्षेप अर्जावर विचार करून ७ दिवसाच्या आत आपल्या स्तरावर योग्यती कार्यवाही करून विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वरील माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांचे मतदार नोंदणी अर्ज स्विकारावेत अशा स्पष्ट सूचना देण्यात याव्यात जेणेकरून नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल. अशा मागणीचे निवेदन मेस्टाचे राज्य संघटक अनिल असरकर व विभागीय कार्याध्यक्ष किरण चौधरी यांनी दिले होते.






