बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मांजरा, गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा यासह इतर स्थानिक च्या नद्यांना पूर आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिके वाहून जाण्याबरोबरच शेतातील माती देखील वाहून गेल्याने दगड गोटे उघडे पडले आहेत, तर विहिरींमध्ये गाळ भरला असून सिंचनाचे साहित्य देखील वाहून गेले आहे, अशा स्थितीत आता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.