• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Why Farmers Keep Drowning In Debt Despite Loan Waivers Article On Agrowon

Agriculture Loan : “शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीतून वगळा, सातबारा आहे म्हणून शेतकरी म्हणायचे का?”

सातबारा असणारा प्रत्येक जण शेतकरी आहे असे आता मानता येत नाही. भ्रष्ट सरकारी अधिकारी, लुबाडणूक करून पैसा कमावणारे, ज्या व्यवसायात अमाप कमाई होते असे बडे व्यवसायिक यांच्याकडे सातबारा आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 10, 2025 | 05:55 PM
"शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीतून वगळा, सातबारा आहे म्हणून शेतकरी म्हणायचे का?"

"शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीतून वगळा, सातबारा आहे म्हणून शेतकरी म्हणायचे का?"

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कायद्याचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही
  • शेतीच्या उत्पन्नावर आयकर नाही
  • रियल इस्टेट म्हणूनही जमीन हे महत्वाचे कलम

अमर हबीब : २०१७ ला शेतकऱ्यांचा संप झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचे लोन पसरले होते. त्या वेळी मी पहिल्यांदा जाहीर भूमिका घेतली होती की, सरकारी पगारदार आणि आयकर भरणारे याना कर्ज-बेबाकी देऊ नये. अशा घटकांना कर्ज-बेबाकी देणे हा तिजोरीवर दरोडा आहे. त्यांना दिले जाणारे पैसे शेतकर्‍यांना द्या. त्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. त्यांनी माझ्या म्हणण्यातील तत्व मान्य केले पण केवळ हे दोन घटक न धरता त्यांनी लांबलचक यादी जोडली, आणि वगळलेल्यांचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. त्यामुळे त्या निर्णयाच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला.

का वगळावे?

मी तालुक्याच्या गावात राहतो. महसूल मधील एका मित्राने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत आमच्या गावातील पाच डॉक्टरांनी सुमारे दोनशे एकर जमीन विकत घेतली. शेतीच्या उत्पन्नावर आयकर नाही म्हणून अशी तजवीज केली जाते. शिवाय रियल इस्टेट म्हणूनही जमीन हे महत्वाचे कलम आहे. तुमच्या भागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे किती जमीन आहे ते पहा. नदीच्या काठच्या जमिनी असो की शिवारात हिरवी कांच दिसणारी शेती पुष्कळदा अशा भ्रष्ट लोकांची असते. हे गौडबंगाल लक्षात येईल.

छत्रपती शिवरायांनी केला अफजलखानाचा वध; जाणून घ्या 10 नोव्हेंबरचा इतिहास

जिल्ह्याच्या एम.आय.डी.सी मध्ये उद्योग असलेले एक कारखानदार सांगत होते की, आमच्या मॉर्निंग ग्रुप मध्ये काही कारखानदार आहेत, काही डॉक्टर आहेत, काही अधिकारी आहेत तर एक जण साखर कारखान्याचे चेयरमनही आहेत. हल्ली आमच्याकडे ‘कोणाला किती पैसे आले?’ यावरच चर्चा होते. कोणी म्हणते, दोन लाख आले, कोणी म्हणते ८० हजार आले. ते पुढे म्हणाले, अशी मदत घेण्याची मला लाज वाटते. आमच्या सारख्यांना का पैसे देता? जे खरे गरजवंत आहेत त्याना द्या. त्यांचे म्हणणे एका प्रामाणिक कारखानदाराचे आहे. मागे हाय कोर्टातील वकील महेश भोसले यांनी मला कर्ज माफी नको, असे जाहीर केले होते.

सरकारी पगार घेणारी व्यक्ती दुसरा व्यावसाय करू शकत नाही. असा कायदा आहे. म्हणून त्याला दुकान काढता येत नाही, गिरणी चालवता येत नाही. पुस्तक प्रकाशन करून विकता येत नाही, म्हणून अनेक सरकारी पगारदार लोक प्रकाशक म्हणून बायकोचे किंवा आईचे नाव टाकतात. माझा मुद्दा त्यांनी काय करावे हा नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की ते जर इतर व्यावसाय करू शकत नाहीत तर ते शेती कशी करतात? शेती हा व्यवसाय नाही का? शेती वंश-परंपरेने आली म्हणून काय झाले? वंश-परंपरेने आलेली शेती करायची असेल तर मग नोकरी का करता? नोकरी करायची असेल तर शेती का? ही सूट कोणी दिली? का दिली? बरे त्यावर ह्यांना कर्जमाफी आणि अनुदानेही हवीत. वेतन आयोगही घेणार आणि शेतकरी म्हणून दुहेरी लाभ ही उपटणार. हे कसे चालेल?

सरकार कारखानदारांचे लाखो कोटीचे कर्ज राईट ऑफ करते मग शेतकऱ्यांमध्ये भेदाभेद का? असा प्रश्न विचारला जातो. मी या प्रश्ना मागची भावना समजू शकतो. असा प्रश्न विचारणारा प्राध्यापक असेल तर लक्षात घ्या, त्याना दोन गोष्टी माहित नाहीत. एक तर सगळ्या कारखानदारांची थकबाकी राईट ऑफ केली जात नाही. सरकारच्या खास मर्जीतील निवडक कारखानदारांचीच थकबाकी राईट ऑफ केली जाते. तेथेही सरसकट नसते. बगलबच्च्यांची कर्जे राईट ऑफ करणे ही बाब मला जास्त गंभीर वाटते. सरकारने केलेला हा पक्षपात घतक आहे. मुठभर कारखानदारांना मार्ग मोकळा करणे देशाच्या हिताचे असणार नाही.

दुसरी बाब ‘शेतकरी तितुका एक एक’ म्हणजे ‘शेतकरी’ तितुका एक एक. बिगर शेतकरी आणि शेतकरी तितुका एक एक नव्हे. यासाठी तुम्हाला शेतकरी या शब्दाची व्याख्या समजावून घ्यावी लागेल. सातबारा आहे म्हणून त्याला शेतकरी म्हणायचे का? असे केले तर अनेक पुढारीच काय दारूचे गुत्तेवाले देखील त्या व्याख्येत येतील. शेतकरी या शब्दाची व्याख्या साधी आहे. ज्याच्या उत्पन्नाचे साधन शेती आहे, तो शेतकरी. शेतकरी तितुका एक एक म्हणजे ज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे ते सगळे एक आहेत. त्यात मजूर, बटाईदार, संत्र्याचा- कापसाचा, बागाईतदार- कोरडवाहू, मराठवाड्यातला- पश्चिम महाराष्ट्रातला, ह्या जातीचा, त्या जातीचा- ह्या धर्माचा- त्या धर्माचा असा भेदाभेद करू नका. ज्यांचे ज्यांचे शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे ते सगळे शेतकरी होत. ज्याना सरकारी पगार मिळतो, ज्याना इतर व्यवसायातून उत्पन्न मिळते, जे राजकारणात कमाई करतात ते कसे शेतकरी होतील.

काहींचे म्हणणे असे की, शेती तोट्यात आहे, ती कोणाचीही असली तरी तोट्यात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे. पगारदार असो की व्यावसायिक त्यांना सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे. ह्या मित्रांनी हे लक्षात घ्यावे की, नोकरदारांना पगार मिळतो, आयकर भरणारे लोक काही कमी कमवत नाहीत, आपली कमाई लपवण्यासाठी ते जमिनी ठेवतात किंवा विकत घेतात. माझा मुद्दा हा आहे की, शेतीच्या लुटीचा मोबदला त्यांना त्यांच्या व्यावसाय आणि नोकरीत मिळतो. त्यामुळे त्यांना तक्रार करायला जागा नाही.

सोपा मार्ग

सरकारी पगारदार आणि आयकर भरणारे यांना वगळणे अवघड नाही. त्यांची यादी करायला घरोघर जाण्याची आवश्यकता नाही. या दोन्ही याद्या काही तासात सरकारला मिळू शकतात. जास्ती जास्त आठ दिवस लागतील. सरकारी पगारदारांची यादी खुद्द सरकारकडे असणारच आहे. आयकर भरणाऱ्यांची यादी देखील महाराष्ट्रातील आयकर खात्याच्या वेबसाईट वर मिळू शकते. फक्त हेच दोन घटक सुरुवातीला वगळले पाहिजेत. माझ्या माहितीनुसार सरकारी कर्मचार्‍यांची संख्या १७ लाख आहे व आयकर भरणाऱ्यांची संख्या जवळपास एक कोटी आहे. या एक कोटी मध्ये सरकारी कर्मचारी समाविष्ट असणार आहेत. ही यादी एकत्र आली की त्या पैकी किती जनांच्या नावे सातबारा आहे, हे सहज काढता येईल. आता सात-बारा देखील ऑनलाईन उपलब्ध आहे. एका बाजूला राज्य पातळीवर ही माहिती तयार करावी दुसऱ्या बाजूला महसूल कर्मचार्‍याकडून माहिती मागवून घ्यावी. आयकर भरणाऱ्यांची यादी स्थानिक महसूल यंत्रणेकडे देऊन त्यात्या नावा वरील क्षेत्र कळू शकेल. सरकारने ठरवले तर ही माहिती आठ दिवसात गोळा होईल. वरील यादीत अनेक असे कर्मचारी आणि आयकर भरणारे लोक असतील की ज्यांच्या नावाने जमीन असणार नाही. हा आकडा किती असले हे आज नक्की सांगता येत नाही.

World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात आणि काय आहे यंदाची थीम?

कर्जबेबाकी सोबत मदतही करा

शेती हे मुख्य उत्पन्नाचे साधन असणारे किती कुटुंब महाराष्ट्रात असतील? याचा नेमका आकडा सरकारकडे नसावा, हे शेतकर्‍यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांप्रती सरकारला कितपत आस्था आहे, याचा हा पुरावा आहे. मी सरकारला सीलिंगच्या जमिनी बद्दल माहिती मागितली होती. त्याबद्दलही हीच अनास्था दिसून आली. खरे तर सरकारची ही अनास्था चिंतेची बाब मानली पाहिजे. सरकार एखादे काम करीत नाही, तेंव्हा विद्यापीठा सारख्या स्वायत्त संस्थांनी पुढे आले पाहिजे. हे काम कोणत्याच विद्यापीठाने आज पर्यंत का केले नाही.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या स्वातंत्र्य पूर्व काळात होत होत्या. नंतरही सातत्याने होत आल्या आहेत. १९६२ ला प्रमाण वाढले म्हणून पी एचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला. १९८६ साली साहेबराव करपे कुटुंबियांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरला. त्या नंतर न्यायालयाच्या आदेशाने सरकारने शेतकरी आत्महत्याची वेगळी नोंद घ्यायला सुरुवात केली. सुमारे पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या उत्पाताचा सरकारवर परिणाम झाला नाही. पण शेतकरी मात्र जागे झाले. कोण्या नेत्याने सांगितले म्हणून नव्हे तर स्वत: शेतकऱ्यांनी ठरवले की, आपली पुढची पिढी शेतीत ठेवायची नाही. याच काळात खुलीकरण आले व इंडीयाचे दार किलकिले झाले. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी फार मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. त्यामुळे आज ‘शेती हे उत्पान्नाचे मुख्य साधन’ असलेली कुटुंबे खूप कमी झाली आहेत. हे वास्तव नीट समजावून घेतले पाहिजे.

आत्महत्या करणारी कुटुंबे तीच आहेत, ज्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे. हे लक्षात घेऊन माझी सरकारला सूचना आहे की, सरकारने कर्जबेबाकी तर करावीच. त्याच बरोबर सरकारी पगारदार व आयकर दात्यांना दिली जाणारी जी रक्कम शिल्लक राहणार आहे ती त्या कुटुंबांमध्ये वाटावी ज्यांचा शेती हाच उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. अशी रक्कम वाटल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळू शकतील. कर्ज- बेबाकी आणि मदत करून थांबू नका. त्याच्या पुढे जाऊन कमाल शेतजमीन धारणा कायदा आणि आवश्यक वस्तू कायदा हे जीवघेणे कायदेही रद्द करावे लागतील.

 

Web Title: Why farmers keep drowning in debt despite loan waivers article on agrowon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • farmer
  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुन्हा नव्याने रंगले नाट्यदालन, नव्या निर्मितींचा वर्षाव, प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादाने रंगभूमी उजळली
1

पुन्हा नव्याने रंगले नाट्यदालन, नव्या निर्मितींचा वर्षाव, प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादाने रंगभूमी उजळली

२,९०० किलो स्फोटके जप्त, दोन डॉक्टरांसह ७ जणांना अटक, सर्वात मोठ्या जैश मॉड्यूलचा पर्दाफाश
2

२,९०० किलो स्फोटके जप्त, दोन डॉक्टरांसह ७ जणांना अटक, सर्वात मोठ्या जैश मॉड्यूलचा पर्दाफाश

हिवाळ्याच्या थंडीत स्वर्गच रूप धारण करतात महाराष्ट्रातील हे 5 स्पॉट, कमी पैशात पूर्ण होईल हिवाळी ट्रिप
3

हिवाळ्याच्या थंडीत स्वर्गच रूप धारण करतात महाराष्ट्रातील हे 5 स्पॉट, कमी पैशात पूर्ण होईल हिवाळी ट्रिप

Explainer: ‘आकाशातील ट्रॅफिक जाम’ने प्रवासी हैराण; फ्लाईट्स नियंत्रण करणारी ATC सिस्टीम काय आहे?
4

Explainer: ‘आकाशातील ट्रॅफिक जाम’ने प्रवासी हैराण; फ्लाईट्स नियंत्रण करणारी ATC सिस्टीम काय आहे?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Agriculture Loan : “शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीतून वगळा, सातबारा आहे म्हणून शेतकरी म्हणायचे का?”

Agriculture Loan : “शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीतून वगळा, सातबारा आहे म्हणून शेतकरी म्हणायचे का?”

Nov 10, 2025 | 05:55 PM
Sushant Singh Rajputच्या केसनंतर रियाची आध्यात्मिक साधना; दिवसातून ७ वेळा करते हनुमान चालीसा पठण

Sushant Singh Rajputच्या केसनंतर रियाची आध्यात्मिक साधना; दिवसातून ७ वेळा करते हनुमान चालीसा पठण

Nov 10, 2025 | 05:53 PM
Maharashtra Local Body Elections 2025: संतोष टारफे भाजपाच्या वाटेवर? आदिवासी विकास मंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण !

Maharashtra Local Body Elections 2025: संतोष टारफे भाजपाच्या वाटेवर? आदिवासी विकास मंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण !

Nov 10, 2025 | 05:38 PM
Local Body Elections 2025: जागा वाटपच्या बैठका ठरल्या वांझोट्या! आश्वासनांचा पाऊस, पण आमदार-खासदार गायब… 

Local Body Elections 2025: जागा वाटपच्या बैठका ठरल्या वांझोट्या! आश्वासनांचा पाऊस, पण आमदार-खासदार गायब… 

Nov 10, 2025 | 05:21 PM
‘माझं करिअर संपलं..’ श्रीदेवी पाय  घसरून पडल्यानंतर ‘या’ अभिनेत्याला सतावत होती भीती, म्हणाला, ”त्यांना राग..”

‘माझं करिअर संपलं..’ श्रीदेवी पाय घसरून पडल्यानंतर ‘या’ अभिनेत्याला सतावत होती भीती, म्हणाला, ”त्यांना राग..”

Nov 10, 2025 | 05:20 PM
विट्यात भांड्याच्या दुकानाला भीषण आग; चौघांचा होरपळून मृत्यू

विट्यात भांड्याच्या दुकानाला भीषण आग; चौघांचा होरपळून मृत्यू

Nov 10, 2025 | 05:15 PM
October 2025 मध्ये ‘या’ Cars चा दरारा वाढत चाललाय! जाणून घ्या Top-5 वाहनांबद्दल

October 2025 मध्ये ‘या’ Cars चा दरारा वाढत चाललाय! जाणून घ्या Top-5 वाहनांबद्दल

Nov 10, 2025 | 05:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

Nov 10, 2025 | 03:44 PM
PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

Nov 10, 2025 | 03:39 PM
Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Jalna : भोकरदन नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज! – भागवत कराड

Nov 09, 2025 | 08:48 PM
Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Thane : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिन्नर-नाशिक ग्रामीण भागात युवा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Nov 09, 2025 | 08:40 PM
Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Jalna : मनोज जरांगे पाटील यांनी चालवला ट्रॅक्टर; रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग

Nov 09, 2025 | 08:30 PM
Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nanded : बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Nov 09, 2025 | 08:24 PM
Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Dhule : टीईटी निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेची मागणी

Nov 09, 2025 | 08:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.