कोकणात एसटी सोडणार जादा बस (फोटो- सोशल मीडिया)
कोकणवासी होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी सज्ज
एसटी महामंडळाने वाहतुकीचे केले नियोजन
रत्नागिरी विभागातून आतापर्यंत सर्वाधिक ५६६ एसटी आरक्षित
गुहागर: मुंबई महानगरातील कोकणवासी होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. एसटीची होळी जादा वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली. मुंबई विभागातून ७८, तर ठाण्यातून ९१ जादा एसटीचे आरक्षण फुल्ल झाले. रत्नागिरी विभागातून आतापर्यंत सर्वाधिक ५६६ एसटी आरक्षित झाल्या आहेत. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी रत्नागिरी सर्वाधिक गाड्यांचे तिकिट प्रवाशांनी आरक्षित केले आहेत. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येते.
होळीकरिता जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून गुहागर, खेड, विपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा एसटी धावणार आहेत. या गाड्या नियमित फे-याव्यतिरिक्त आहेत. मुंबईतील ७८ पैकी ३९ बसचे समुह आरक्षण झाले आहे.
होळीसाठी मध्य रेल्वेने स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. याशिवाय कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्या देखील तिकिट फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना धावत आहेत. नियमित गाड्यांचे स्पेशल गाड्यांवर अवलंबून रहावे लागणार आहे.
Pratap Sarnaik : डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; परिवहनमंत्र्यांचा सज्जड दम
डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री सरनाईक म्हणाले की, सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10 लाख 87 हजार लिटर डिझेलची गरज भासते. हे डिझेल प्रामुख्याने इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमिटेड आणि भारत प्रेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांकडून खरेदी केले जाते.
St Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा
घाऊक ग्राहक म्हणून एसटीला या कंपन्याकडून प्रति लिटर 2 रुपये 70 पैसे सवलत देते. मात्र, संबंधित कंपनीची बैठक घेऊन या सवलती मध्ये 30 पैसे वाढवून घेतले. त्यामुळे महामंडळाचे वर्षाकाठी 10 ते 12 कोटीची बचत होऊ लागली. तथापि, 3 रुपयांची सवलत मिळत असली, तरी इतर राज्य परिवहन महामंडळांना यापेक्षा अधिक सवलत मिळत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला याच कंपन्यांनी 4 रुपये पेक्षा जास्त सवलत देऊ केली आहे. एवढेच नाही तर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळाला तब्बल 5 रुपये 50 पैसे सवलत मिळत आहे.






