Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही... फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही
टेक कंपनी ॲपल आयफोनमध्ये एक खास कॅमेरा कंट्रोल बटन देते. पण जर तुम्ही अँड्रॉइड युजर्स असाल पॉवर बटनचा वापर करून फोटो कॅप्चर करू शकता. अनेकदा असं होतं की आपण एखादे सुंदर दृश्य पाहतो मात्र कॅमेरा ओपन करेपर्यंत वेळ निघून केलेला असतो. अशावेळी तुम्ही स्मार्टफोनच्या पॉवर बटणचा वापर करू शकता. तुम्ही स्मार्टफोनचे पावर बटन दोन वेळा प्रेस करून कॅमेरा ऍक्सेस करू शकता. यामुळे काही क्षणातच कॅमेरा ओपन होईल आणि तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या लाँच केले जाणारे स्मार्टफोन्स अधिक अपडेट आणि अपग्रेड असतात. यामध्ये यूजरच्या फायद्यासाठी AI असिस्टंट दिलेले असतात जे युजर्सची काम अधिक सोपी करतात. तुम्ही पावर बटन होल्ड करून एआय असिस्टंट जसे जेमिनी आणि दुसरी व्हॉइस असिस्टंट ॲक्सेस करू शकता. यावेळी तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर माहिती देखील मिळवू शकता. याशिवाय एखाद्या व्यक्तीला कॉल करायचा असेल तर तुम्हाला फोनला हात लावायची गरज देखील भासणार नाही.
अंधारात जेव्हा तुम्हाला बॅटरीची गरज असते तेव्हा फोनची फ्लॅश चालू करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अनलॉक करावा लागतो. मात्र अनेक फोन्समध्ये पॉवर बटणद्वारे फ्लॅश चालू आणि बंद करण्याचा ऑप्शन मिळतो. तुम्हाला केवळ सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर ऍक्टिव्ह करावे लागते त्यानंतर तुम्ही बटन प्रेस करून स्मार्टफोनचे फ्लॅश चालू किंवा बंद करू शकता.
पावर बटनवर तुम्ही इमरजेंसी SOS फीचर देखील सेट करु शकता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावर बटनचा सर्वाधिक वापर इमरजेंसी SOS फीचरमध्ये केला जातो. जर ही सेटिंग चालू असेल तर पॉवर बटण 3 किंवा 5 वेळा दाबल्याने, फोन आपोआप आपत्कालीन संपर्कांना स्थान आणि महत्त्वाची माहिती पाठवतो. कठीण काळात हे फीचर अतिशय फायद्याचे ठरते.
तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन येणारे कॉल कट करण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. एकदा तुम्ही पॉवर बटण दाबा कॉल समाप्त करण्यासाठी पर्याय सक्षम केल्यानंतर, तुम्ही फक्त एकदा पॉवर बटण दाबून कोणताही कॉल समाप्त करू शकता.






