कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेपासूनच रखडलेला कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच तापलायं..शहराला लागून असणाऱ्या गावांसह ग्रामीण भागातील 20 गावांचा कोल्हापूरच्या हद्दवाढीला तीव्र विरोध आहे..परंतु हद्दवाढीसाठी मोठं आंदोलन उभारणार असून कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ केल्याशिवाय थांबणार नसल्याचा आक्रमक पवित्रा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने घेतलायं..कोल्हापूर महानगपालिकेची हद्द 1972 पासून 66.82 चौरस किलो मीटर इतकीच आहे..ज्यामुळे शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत..हद्दवाढीसाठी महापालिका प्रशासनाने 6 वेळा शासनाला प्रस्ताव पाठवले आहेत..परंतु राजकीय विरोधामुळे आतापर्यंत यावर कार्यवाही झालेली नाही..दरम्यान पहिल्यापासून शहरालगतच्या गावांचा समावेश हद्दवाढीमध्ये करण्याची आमची भूमिका आहे..मात्र हद्दवाढीसाठी लोकप्रतिनिधीच आडवे येतात..हद्दवाढ करु म्हटलं की..मोर्चे निघतात..मग करायचं काय? असा सवाल करत हद्दवाढीसाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंयं.