Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
Supreme Court on Cockroach Janta Party Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांदरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेला अतिरीक्त बळाचा वापर आणि पोलिसांविरोधात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणांच्या तपासासाठी सुप्रीम कोर्टाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, या समितीत सुप्रीम कोर्टाचे एक माजी न्यायमूर्ती, कोणत्याही हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आणि एक वरिष्ठ निवृत्त पोलिस अधिकारी यांचा समावेश असेल. वाचा सविस्तर-
19 Aug 2026 02:59 PM (IST)
मराठवाड्यात आज आणि उद्या काही भागात पावसाची शक्यता असली, तरी त्यानंतर पावसाची मोठी उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमिवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने शेतकऱ्यांना विशेष कृषी सल्ला दिला आहे. पिकांना पाण्याचा ताण येऊ नये यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासोबतच आवश्यकतेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पिकाची काळजी घेण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ कैलास डाखोरे यांनी केले आहे.
19 Aug 2026 02:48 PM (IST)
भुसावळ तालुका पोलिसांनी प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १३ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साकेगाव शिवारातील ग्रामीण रुग्णालयाजवळील सर्व्हिस रोडवर सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
19 Aug 2026 02:38 PM (IST)
रिक्षा परवान्यासाठी मराठी बंधनकारक करण्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. आपल्या भाषेचा सन्मान आणि प्रसार करणे आवश्यक आहेच. पण त्यासाठी रोजगाच्या अटीची शिक्षा नको. एखाद्या गरिबाला भाषा येत नाही, म्हणून त्याचा रोजगार हिसकावून घेणे, हे योग्य नसल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
19 Aug 2026 02:26 PM (IST)
भुसावळ तालुका पोलिसांनी प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १३ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साकेगाव शिवारातील ग्रामीण रुग्णालयाजवळील सर्व्हिस रोडवर सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
19 Aug 2026 02:13 PM (IST)
आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, भाजप किती निर्दयी आहे, किती GenZ विरोधी आहे आणि कशी मुंबई लुटत आहे, याचे खुले प्रदर्शन BMC मध्ये सुरू आहे. लहान मुलांपासून अगदी देशासाठी खेळणाऱ्या फुटबॉलपटूंचे 'नेव्हिल डिसोझा फुटबॉल टर्फ', सत्तेचे बळ वापरून कसं चोरता येतं याचं देखील प्रदर्शन! नेव्हिल डिसोझा टर्फ घेऊन प्रदर्शन केंद्र करणार. बाजूला SRA येत आहे. तिथेच बांद्रा बे रिडेव्हलपमेंट होत आहे. तिथेच अदानीने MSRDC ची जागा घेतली आहे… बांद्रामध्ये किती ट्रॅफिक होईल, किती गळचेपी होईल... याचा विचार न करता जागा ढापायची असं भाजपने ठरवलं आहे.
19 Aug 2026 02:04 PM (IST)
मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर गुरूवारपासून कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. गुरूवारपासून संबंधित चालकांना एक महिन्याची नोटीस दिली जाईल. या कालावधी त्याने मराठी शिक्षणे आवश्यक आहे. एक महिन्यानंतरही मराठी बोलता न आल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले
19 Aug 2026 02:00 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयपूर्ण आणि वेगळ्या विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशाच एका वेगळ्या विषयाची मांडणी करणारा ‘लग्न आणि बरंच काही’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्त्रीचे भावविश्व, लग्नानंतर बदलणारी नाती, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख जपण्याचा तिचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे मंत्रालयात अनावरण करण्यात आले.
19 Aug 2026 01:55 PM (IST)
माथेरान शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ब्रिटिशांनी धरण बांधले. त्या शार्लोट लेक या धरणातील पाणी ठेकेदाराला फायदा व्हावा म्हणून सोडून देण्यात आले.त्यानंतर प्रचंड वादंग निर्माण झाला असून अखेर माथेरान नगरपरिषदेला जाग आली आहे. पालिकेने नेमलेली ठेकेदाराने आता मनुष्यबळ वापरून जुन्या प्रथेनुसार तलावातील माती काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान,काल पासून 50 मजूर गाळ काढण्याचे काम करीत असून पाणी कशासाठी सोडले आणि विना परवाना पाणी सोडणाऱ्यावर शासन कोणती कारवाई करणार आहे? असा संतप्त सवाल माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी उपस्थित केला आहे.
19 Aug 2026 01:50 PM (IST)
कुपवाड येथे दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध करत आरोपी फरीद शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि फाशीची शिक्षा द्यावी, या मागणी साठी या घटनेच्या निषेधार्थ २१ ऑगस्ट रोजी सांगली-कुपवाड शहर बंद आणि मोर्चा काढला जाणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी नितीन चौगुले, नाना वाघमारे उपस्थित होते.
19 Aug 2026 01:45 PM (IST)
महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तामिळनाडू सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही महिला सरकारी कर्मचाऱ्यांना ३६५ दिवसांची म्हणजेच वर्षभराची प्रसूती रजा मिळणार आहे. यापूर्वी तिसऱ्या अपत्यासाठी केवळ १२ आठवड्यांची प्रसूती रजा मिळत होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे तिसऱ्या अपत्याच्या मातांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे मानव संसाधन व्यवस्थापन मंत्री डी. सरथकुमार यांनी विधानसभेत आपल्या विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान या निर्णयाची घोषणा केली.
19 Aug 2026 01:35 PM (IST)
ओपनएआयने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवीन सेफ्टी आणि लर्निंग फीचर लाँच केले आहे. यामुळे किशोरवयीन मुलांना चॅटजीपीटी वापरण्याचा एक खास अनुभव मिळणार आहे. हे नवीन फीचर कमी वयाच्या यूजर्सची एआय चॅटबोट वापरण्याची पद्धत बदलणार आहे. यामध्ये सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी जास्तीचे सेफगार्ड्स आणि टूल्स जोडण्यात आले आहेत. यासोबतच, ओपनएआय पालकांना त्यांच्या मुलांच्या चॅटजीपीटीच्या वापराबाबत काही ऐच्छिक कंट्रोल्स देखील उपलब्ध करून देईल.
19 Aug 2026 01:30 PM (IST)
सरकारने देशातील अधिक घरांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) जोडण्या वाढवण्यासाठी एका प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना १ सप्टेंबर २०२६ पासून लागू केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. ज्या घरांकडे आधीपासूनच जोडण्या आहेत, परंतु ज्यांनी अद्याप बिल भरायला किंवा गॅस वापरायला सुरुवात केलेली नाही, अशा घरांना PNG पुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. PNG नेटवर्कचा नवीन भागांमध्ये विस्तार करण्यावरही भर दिला जाईल.
19 Aug 2026 01:25 PM (IST)
परदेशात पैसे पाठवणं ही काय मोठी गोष्ट नाही. पण जर ती रक्कम फार मोठी असेल आणि संशयास्पद असेल तर ? अशाच परदेशात मोठी रक्कम ट्रान्सफर करणाऱ्या आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाने आपली करडी नजर वळवली आहे. या कारवाईतून परदेशात पैसे ( Foreign Money Transfer ) पाठवण्यावर कारवाई करण्यासाठी आयकर विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे. विभागाने या संशयास्पद पैशांच्या हस्तांतरणाची देशव्यापी चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमध्ये अंदाजे ३९४ संस्था आणि ३६ व्यावसायिकांचा समावेश आहे.
19 Aug 2026 01:15 PM (IST)
राज्य सरकारने प्रशासकीय कामकाज अधिक केंद्रीकृत करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र शासन कार्यव्यवहार नियम, २०२६’ नियामावली लागू केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, राज्य सरकारमधील एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. पण मंत्र्यांचे निर्णय बदलताना ते का बदलण्यात आले त्यामागील कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहेत.
19 Aug 2026 01:05 PM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या एका नव्या सोशल मीडिया पोस्टने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून एक असा नकाशा शेअर केला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि विशेषतः मध्य पूर्वेत प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या नकाशात संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) अतिशय प्रसिद्ध आणि व्यापारी केंद्र मानले जाणारे दुबई शहर, फुजैरह, इराणचे अत्यंत मोक्याचे केशम बेट आणि ओमानचा काही भूभाग हा थेट अमेरिकेची नवी हद्द किंवा वॉशिंग्टनचे नियंत्रण असलेला प्रदेश म्हणून दर्शवण्यात आला आहे.
19 Aug 2026 01:00 PM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या एका नव्या सोशल मीडिया पोस्टने संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून एक असा नकाशा शेअर केला आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि विशेषतः मध्य पूर्वेत प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या नकाशात संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) अतिशय प्रसिद्ध आणि व्यापारी केंद्र मानले जाणारे दुबई शहर, फुजैरह, इराणचे अत्यंत मोक्याचे केशम बेट आणि ओमानचा काही भूभाग हा थेट अमेरिकेची नवी हद्द किंवा वॉशिंग्टनचे नियंत्रण असलेला प्रदेश म्हणून दर्शवण्यात आला आहे.
19 Aug 2026 12:55 PM (IST)
Maharashtra Rules Mahayuti Ministers Decision Power: राज्य सरकारने प्रशासकीय कामकाज अधिक केंद्रीकृत करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र शासन कार्यव्यवहार नियम, २०२६’ नियामावली लागू केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, राज्य सरकारमधील एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. पण मंत्र्यांचे निर्णय बदलताना ते का बदलण्यात आले त्यामागील कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहेत. राज्य सरकारच्या या नव्या नियमांमुळे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या अधिकारांमध्ये महत्त्वाचे बदल झाले आहेत. संबंधित खात्याचा मंत्री हा त्या खात्याचा प्राथमिक निर्णयकर्ता असला तरी काही अपवादात्मक परिस्थितीत आणि जनहिताच्या दृष्टीने मंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे.
19 Aug 2026 12:50 PM (IST)
ओपनएआयने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवीन सेफ्टी आणि लर्निंग फीचर लाँच केले आहे. यामुळे किशोरवयीन मुलांना चॅटजीपीटी वापरण्याचा एक खास अनुभव मिळणार आहे. हे नवीन फीचर कमी वयाच्या यूजर्सची एआय चॅटबोट वापरण्याची पद्धत बदलणार आहे. यामध्ये सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी जास्तीचे सेफगार्ड्स आणि टूल्स जोडण्यात आले आहेत. यासोबतच, ओपनएआय पालकांना त्यांच्या मुलांच्या चॅटजीपीटीच्या वापराबाबत काही ऐच्छिक कंट्रोल्स देखील उपलब्ध करून देईल. कंपनीने लाँच केलेल्या चॅटजीपीटी फॉर टिन्सचे ग्लोबल रोलआउट सुरु केले आहे आणि येणाऱ्या आठवड्यात हे फीचर सर्व पात्र अकाऊंट्सवर दिसणार आहे.
19 Aug 2026 12:45 PM (IST)
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक कबीर खान यांच्या आगामी स्पोर्ट्स ड्रामाच्या चित्रीकरणादरम्यान कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून, शेवटच्या दोन दिवसांत काही महत्त्वाची ॲक्शन दृश्ये चित्रित केली जाणार होती. मात्र, त्याआधीच कार्तिकला दुखापत झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना कार्तिकच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला फोर्टिस रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या गुडघ्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
19 Aug 2026 12:40 PM (IST)
Tamil Nadu Maternity Leave: महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तामिळनाडू सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही महिला सरकारी कर्मचाऱ्यांना ३६५ दिवसांची म्हणजेच वर्षभराची प्रसूती रजा मिळणार आहे. यापूर्वी तिसऱ्या अपत्यासाठी केवळ १२ आठवड्यांची प्रसूती रजा मिळत होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे तिसऱ्या अपत्याच्या मातांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे मानव संसाधन व्यवस्थापन मंत्री डी. सरथकुमार यांनी विधानसभेत आपल्या विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान या निर्णयाची घोषणा केली.
19 Aug 2026 12:35 PM (IST)
Delhi Crime: दिल्लीतील नैऋत्य जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनने डेटिंग ॲपद्वारे झालेल्या फसवणूक आणि मोबाईल चोरीच्या एका प्रकरणाचा छडा लावला असून दोन महिला संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणात एका ६७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने एका डेटिंग ॲपद्वारे एका महिलेशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर टेलिग्रामवर संभाषण झाले आणि एक भेट ठरवण्यात आली.
पीडित व्यक्ती २० आणि २४ जुलै, २०२६ रोजी त्या दोन महिलांना भेटला. २४ जुलै रोजी, डिफेन्स कॉलनीतील एका रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणानंतर पीडित व्यक्तीचा मोबाईल फोन चोरीला गेला. त्यानंतर, मोबाईल फोन आणि त्याच्याशी संबंधित बँकिंग सुविधेचा वापर करून, पीडित व्यक्तीच्या दोन बँक खात्यांमधून यूपीआयद्वारे १.३० लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले.
19 Aug 2026 12:30 PM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) भू-राजकीय परिस्थितीत पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) इराणसोबतचे सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि आर्थिक व्यवहार पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. इराणकडून दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचा आणि नौदलाच्या मार्गांना लक्ष्य करण्यात आल्याचा गंभीर आरोप UAE ने केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण UAE मध्ये काही काळासाठी आपत्कालीन धोक्याचा इशारा (Emergency Alert) जारी करण्यात आला होता. दुसरीकडे, इराणने या सर्व दाव्यांचे खंडन करत आपल्यावरील सर्व आरोप पायाहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.
19 Aug 2026 12:20 PM (IST)
NTA Office Protest: युजीसी नेट (UGC NET) च्या तीन विषयांची परीक्षा रद्द केल्यानंतरही वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. परीक्षेबाबत आता विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्या समोर येत आहेत. याच संदर्भात विद्यार्थी आणि शिक्षकांचे एक शिष्टमंडळ नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA च्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपल्या मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शिष्टमंडळाने विशेष करून अशी मागणी केली की, इंग्रजी आणि कॉमर्सची परीक्षा पुन्हा घेतली जाऊ नये.
19 Aug 2026 12:15 PM (IST)
गजानन गिरी, मसूर : शेतकऱ्यांच्या बरोबरीने आता महिलाही शेती क्षेत्रात पुढाकार घेत आहेत. कराड तालुक्यातील शामगावच्या रणरागिणी महिला गटाने सामूहिक सेंद्रिय शेतीचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र शासन व पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खरीप पीक स्पर्धेत त्यांचा सहभागही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यस्तरीय ‘फार्मर कप’ जिंकण्याच्या जिद्दीने गटाने शेतीतील विविध कामांना जोमात सुरुवात केली आहे.
19 Aug 2026 12:10 PM (IST)
केरळचा सायकलिस्ट सनीद याने विना फ्रंट व्हील सायकलने केरळ ते एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा चमत्कारी निर्धार बनवला आहे. हे करण्यामागे सनीदचा ध्येय रेकाॅर्ड बनवणे नाहीये तर ‘Say No to Drugs’ चा संदेश देणं आहे. याआधीही त्याने केरळ ते काश्मीर विना फ्रंट व्हील सायकलचा प्रवास केला आहे. यावेळी मात्र केरळ ते एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचा ध्येय त्याने ठरवले आहे. या यात्रेचा प्रारंभ ५ मे २०२६ पासून करण्यात आला आहे.
#WATCH | Tiruchirappalli: Kerala cyclist, Saneed, rides 11,000 km from Kerala to Nepal on a bicycle without a front wheel to spread the message - ‘Say No to Drugs’.
He says, “I completed a ride from Kerala to Kashmir without a front wheel, and now I am going from Kerala to… pic.twitter.com/95agDos8d3— ANI (@ANI) August 19, 2026
credit - social media and Twitter
19 Aug 2026 12:05 PM (IST)
Nashik Earthquake News In Marathi: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे (Nashik Earthquake) सौम्य धक्के जाणवले आहेत. पेठ तालुक्यात बुधवारी (19 ऑगस्ट 2026) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक जमिनीला कंप जाणवला. गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जाणवलेल्या या कंपनांमुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. सकाळच्या वेळेत अनेक नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्याचवेळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांची धावपळ झाली. काही नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झाल्याची माहिती नाही.
19 Aug 2026 11:58 AM (IST)
भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवून न देणाऱ्या घरमालक आणि पीजी चालकांविरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध भागांत केलेल्या कारवाईत 150 हून अधिक घरमालक आणि पीजी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
19 Aug 2026 11:49 AM (IST)
ठाणे शहरातील रखडलेल्या क्लस्टर पुनर्विकासाला गती देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. मात्र, याच प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्येच जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपचा तीव्र विरोध झुगारून सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्यामुळे ठाण्यातील सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
19 Aug 2026 11:36 AM (IST)
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला आता विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे.. बाळासाहेब थोरात या विद्यापीठाचे कुलपती झाले असून, विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
19 Aug 2026 11:29 AM (IST)
पुणे महापालिका निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक नेत्यांचे पक्षांतर झाले असून, विविध पक्षांकडून संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे शहराची जबाबदारी दोन भागांत विभागून नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. आता विशाल तांबे आणि श्रीकांत पाटील हे पुण्यात पक्षाला किती बळ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
19 Aug 2026 11:28 AM (IST)
ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राजकीय रस्सीखेच सुरू असतानाच वनमंत्री गणेश नाईक यांचा गडकरी रंगायतन येथे पुन्हा जनता दरबार होणार आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा वारंवार होणारा जनता दरबार हा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरत आहे.
19 Aug 2026 11:19 AM (IST)
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी मंजूर केलेला निधीचा ठराव रद्द करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष झाला. सभागृह नेते गणेश बीडकर यांनी युती आता फक्त राज्यात असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीला थेट इशारा दिला. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
19 Aug 2026 10:54 AM (IST)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी एजन्सीने आपल्या परीक्षा विभागाची मोठी पुनर्रचना केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, NTA ने तब्बल ६०० तज्ज्ञांना हटवून त्यांच्या जागी नवीन तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. तसेच NTA चे नवीन कार्यालय आता मिंटो रोड येथे असणार आहे.
19 Aug 2026 10:44 AM (IST)
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने एका ९ वर्षांच्या मुलीला सायकलवरून उसाच्या शेतात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवार (१८ ऑगस्ट)च्या दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सुत्रे फिरवत एका संशयित तरूणाला ताब्यात घेतले आहे.
19 Aug 2026 10:34 AM (IST)
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात Rishabh Pant ने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवून भारतीय क्रिकेटच्या विक्रमांमध्ये आपले नाव कोरले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात पंतने ६९ चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या. त्याच्या या वेगवान खेळीने संघाला केवळ महत्त्वपूर्ण धावाच मिळवून दिल्या नाहीत, तर त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनवले. पंतच्या फलंदाजीत सुरुवातीपासूनच आक्रमक वृत्ती दिसून आली. त्याने उघडपणे श्रीलंकेच्या गोलंदाजांना लक्ष्य केले आणि वेगाने धावा केल्या. त्याने पहिल्या डावात ३९ धावा केल्या. याचा अर्थ गॉल कसोटीतील पंतची एकूण धावसंख्या १०५ आहे. भारत सध्या उत्तम स्थितीत असून श्रीलंकेविरूद्ध जिंकण्यासाठी सज्ज आहे.
19 Aug 2026 10:24 AM (IST)
सरकारी कार्यालयात काम करून घेण्यासाठी लाच मागितल्याच्या तक्रारी बऱ्याचदा लोकांची वैयक्तिक अडचण बनते, पण आता दोन बी.टेक (BTech) विद्यार्थ्यांनी अशा तक्रारी एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘Bribes.fyi’ नावाचा नवीन ऑनलाइन प्लॅटफॉर्म लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये कथितपणे लाच मागितल्याचे अनुभव अनानामिक (गुमनाम) पद्धतीने नोंदवण्याची संधी देतो. याचा उद्देश कोणत्याही विभागाला भ्रष्ट घोषित करणे हा नसून, देशभरातून समोर येत असलेल्या अशा तक्रारी एका सार्वजनिक आणि शोधण्यायोग्य डेटाबेसमध्ये नोंदवणे हा आहे. या उपक्रमाशी जोडलेले आर्यन निषाद आणि त्यांच्यासोबत काम करणारे दुसरे बी.टेक विद्यार्थी यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक असा प्लॅटफॉर्म तयार केला आहे, जिथे कोणतीही व्यक्ती आपली तक्रार नोंदवू शकते.
19 Aug 2026 10:14 AM (IST)
राठी सिनेमाची खरी ताकद त्याच्या वैविध्यपूर्ण कथांमध्ये आहे. वेगवेगळे विषय, लक्षवेधी कथानकं आणि दमदार अभिनयामुळे मराठी कंटेंटने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता जुने तसेच नवे मराठी चित्रपट आणि वेबसीरिज अल्ट्रा झकास मराठी या OTT प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत.
19 Aug 2026 10:04 AM (IST)
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील बदल्यानंतर कोपरखैरणे वाहतूक विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी योगेश शिंदे यांनी स्वीकारली आहे. मात्र, नवीन प्रभारी अधिकारी रुजू होऊन काही दिवस उलटले तरी कोपरखैरणे परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर प्रभावी नियोजन आणि प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असताना, काही ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती आणि दुसरीकडे ई-चालानच्या माध्यमातून कारवाईचा वेग यामुळे ‘वाहतूक नियंत्रण की दंडवसुली?’ असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. कोपरखैरणेतील डी-मार्ट सर्कल, कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसर तसेच घणसोली रेल्वे स्थानक परिसरात सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
19 Aug 2026 09:35 AM (IST)
भारतात दररोज सरासरी १ ते १० कोटी मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला जातो. या पार्श्वभूमीवर, सरकारने सोशल मीडियावरील आपली पकड वाढवली आहे. गेल्या पाच महिन्यांत, सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सरासरी प्रत्येक ६८८ सेकंदाला एक ब्लॉकिंग आदेश जारी केला आहे. गेल्या ५ महिन्यांत अंदाजे १.९५ लाख ब्लॉकिंग आदेश जारी करण्यात आले आहेत. याचा अर्थ सरकारने दररोज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना १,२७५ ब्लॉकिंग आदेश पाठवले आहेत. यावर्षी मार्च ते जुलै दरम्यान, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर पोस्ट केलेला ऑनलाइन मजकूर ब्लॉक करण्याच्या सरकारी निर्देशांमध्ये वाढ झाली आहे.
19 Aug 2026 09:30 AM (IST)
India vs Sri Lanka Galle Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा थरार आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून, भारतीय संघ विजयापासून अवघ्या ६ विकेट्स दूर आहे.
भारतीय संघाने दिलेल्या ३७२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाची बिकट अवस्था झाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमान श्रीलंकेने ४ गडी गमावून ८४ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे विजयासाठी भारताला ६ विकेट्स, तर श्रीलंकेला अजूनही २८८ धावांची गरज आहे.
19 Aug 2026 09:25 AM (IST)
Junnar Crime News: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आक्रमक तपास करत पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही भयानक घटना काल (मंगळवार, १८ ऑगस्ट) दुपारी ३:३० ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
19 Aug 2026 09:20 AM (IST)
Junnar Crime News: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आक्रमक तपास करत पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही भयानक घटना मंगळवार (१८ ऑगस्ट) दुपारी ३:३० ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
19 Aug 2026 09:15 AM (IST)
BEST Depot Lease Controversy: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या 'बेस्ट'च्या (BEST) २४ डेपोंची जागा ६० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या लीजवर (भाडेतत्त्वावर) देण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने (BMC) तयार केला आहे. या प्रस्तावावरून आता मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधी पक्षांनी याविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रस्तावावर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
19 Aug 2026 09:10 AM (IST)
NTA Reform Meeting Update: राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) कार्यपद्धतीवर आणि परीक्षांच्या पारदर्शकतेवर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक उच्चस्तरीय फॉलो-अप बैठक घेतली. देशातील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी NTA ची सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचे कडक निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. या बैठकीनंतर NTA च्या प्रशासकीय आणि परीक्षा प्रणालीत मोठे फेरबदल करण्यात आले असून, तब्बल ६०० विषय तज्ज्ञांना (Subject Experts) पॅनेलवरून हटवण्यात आले आहे.
19 Aug 2026 09:00 AM (IST)
Kolkata Hotel Fire: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कोलकात्यातील मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरात असलेल्या एका हॉटेलला मध्यरात्री सुमारे दोन वाजता अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये पसरलेल्या प्रचंड धुरामुळे श्वास गुदमरून एका लहान मुलासह ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जे ज्या हॉटेलला आग लागली, त्या हॉटेलपासून अगदी हाकेच्या अंतरावरच अग्निशमन दलाचे कार्यालय (Fire Brigade Office) आहे. तरीही या दुर्घटनेत ९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याने प्रशासनाच्या तत्परतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
19 Aug 2026 08:55 AM (IST)
Ritu Tawde Social Media Controversy: मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे या पुन्हा एकदा आपल्या एका प्रशासकीय निर्णयामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. महापौरांच्या सोशल मीडिया खात्यांची प्रसिद्धी करण्यासाठी आणि फॉलोअर्स/लाइक्स वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिका तब्बल २५ लाख रुपये खर्च करणार असल्याचा प्रस्ताव समोर आला आहे.
महापौरांची डिजिटल प्रसिद्धी आणि सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्यासाठी ही मोठी रक्कम खर्च करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर सध्या चहुबाजूंतून टीका होत असून, महापालिकेच्या स्थायी समितीत (Standing Committee) सादर होणाऱ्या या प्रस्तावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
19 Aug 2026 08:50 AM (IST)
Jharkhand Recruitment Exams Cancelled: झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. झारखंड सरकारने मध्यरात्री आठ स्वतंत्र अधिसूचना जारी करत तब्बल ४४ भरती परीक्षा अधिकृतपणे रद्द केल्याची यादी जाहीर केली आहे. या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) आणि 'टीडीपीएल' (TSR Data Processing Pvt Ltd) या आउटसोर्सिंग एजन्सीद्वारे २०१४ पासून आयोजित केलेल्या परीक्षांचा समावेश आहे.






