जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखाने बंद करावेत, मस्जिदींवरील भोंगे तात्काळ हटवावेत आणि इतर धार्मिक मागण्यांसाठी मढी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मरकड येत्या सोमवारपासून साधू-संत आणि हिंदुत्ववादी संघटनांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. प्रशासनाने वारंवार स्मरणपत्र देऊनही कारवाई न केल्यामुळे त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तसेच गोवंशीय मांस आढळलेल्या पोलिस स्टेशनमधील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.