Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय
बॅटल रॉयल मोबाईल गेम फ्री फायर मॅक्सच्या प्लेअर्सची संख्या प्रचंड आहे. या गेममध्ये रँक वाढवण्यासाठी आणि जास्त काळ टिकून राहण्यासाठी प्लेअर्सना शत्रूंना मारावे लागते. मात्र प्रो प्लेअर्ससमोर टिकून राहणं अत्यंत कठिण आहे. यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मॅचमध्ये अगदी सहज विजय मिळवू शकता. काही सोप्या टिप्स तुम्हाला फ्री फायर मॅक्समध्ये विजय मिळवून देऊ शकतात.
फ्री फायर मॅक्समध्ये अनेक लोकेशन असतात, जिथे मोठ्या प्रमाणात प्लेअर्स लँड करत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी सर्वाईव्ह करणं खूप कठिण होतं. कारण तुमच्यासमोर जर एखादा प्रो प्लेअर असेल तर तुमचा गेम तिथेच संपू शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी लँड करण्याऐवजी गेममधील अशा ठिकाणी लँड करा जिथे गेमर्सची संख्या कमी असेल. यामुळे गेममध्ये सर्वाईव्ह करण्याची संधी वाढते आणि तुम्हाला वेळीच वेपन, बुलेट आणि मेडिकल किट मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
गरेना फ्री फायर मॅक्समध्ये तुमच्या शत्रूंना मारण्यासाठी योग्य वेपनची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य वेपन लोडआउट केल्यास क्लोज आणि लॉन्ग रेंज लढाईत शत्रूंना सहजपणे नॉक आउट केले जाऊ शकते. योग्य वेपन कॉम्बिनेशनसाठी तुम्हाला SCAR सह Sniper गन कलेक्ट करावी लागणार आहे. दोन्ही वेपनसोबत येणाऱ्या अटॅचमेंट वापरा. यामुळे बंदूक नियंत्रित करणे सोपे होईल आणि शत्रूंना मारणं सोपे होईल.
ग्लू वॉल फ्री फायर मॅक्समध्ये मिळणारे प्रोटेक्शन टूल आहे. या खास वॉलचा वापर करून तुम्ही शत्रूंपासून तुमचे रक्षण करू शकता. त्यामुळे गेम खेळताना ग्लू वॉलचा वापर करायला विसरू नका. यामुळे तुम्ही गेममध्ये दिर्घकाळ सर्वाईव्ह करू शकता.
फ्री फायर मॅक्समध्ये Alok सारखे मिळणारे कॅरेक्टर वेगवेगळ्या शक्तींसह येतात. तुम्ही गेममधील शत्रूंना संपवण्यासाठी याचा वापर करू शकता. तुमच्या खेळण्याच्या प्लेइंग स्टाइलनुसार कॅरेक्टर निवडा. यामुळे विजयाचा मार्ग सोपा होईल.
फ्री फायर मॅक्स हा Garena च्या मालकीचा मोबाईल गेम आहे. Garena रोज फ्री फायर मॅक्स प्लेयरसाठी रेडिम कोड्स जारी करत असते. या रेडिम कोड्स च्या मदतीने प्लेयर्सना इन – गेम्स आयटम जिंकण्याची संधी मिळते. फ्री फायर मॅक्स खेळताना शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि गेममध्ये जास्त वेळ टिकून राहण्यासाठी इन-गेम आइटम्स अत्यंत गरजेचे असतात.
या इन-गेम आइटम्सच्या मदतीने प्लेयर्स त्यांच्या शत्रूवर विजय मिळवू शकतात आणि त्यांची एक वेगळी ओळख देखील निर्माण करू शकतात. सहसा हे गेमिंग आयटम पाहिजे असतील तर प्लेअर्सन त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. मात्र redeem कोड्स च्या मदतीने प्लेयर्सना हे इन-गेम आइटम्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळते. Garena ने जारी केलेले हे कोड्स 12 ते 16 डिजिट असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोड्स ठराविक काळासाठी लाईव्ह असतात. त्यामुळे शक्य असेल तितक्या लवकर हे कोड्स क्लेम केले तर तुम्हाला अनेक इन-गेम आइटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.






