खेड्या गावातील कोळसा आणि लाकूड वापरून स्वयंपाक करण्याची पद्धत आता शहरात आली आहे. फक्त वापराची पद्धत बदलली आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे. मुख्य म्हणजे याचा परिणाम व्यावसायिक गॅसवर झाला आहे. या गॅसला शाश्वत पर्याय म्हणून पुन्हा एकदा पारंपरिक कोळसा आणि शेगडीची मागणी आहे. पुणे शहरातील समुचित उद्योगाच्या संचालक प्रियदर्शनी कर्वे यांनी काही अविष्कार केले आहेत. जे गॅसला पर्याय म्हणून समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. पालापाचोळा आणि कचऱ्यापासून कोळसा निर्माण केला जाऊ शकतो. हा कोळसा प्रियदर्शनी यांनी तयार केलेल्या शेगडी कुकरमध्ये वापरला जाऊ शकतो. “100 ग्राम कोळशामध्ये 4 माणसांसाठी भात, भाजी आणि वरण शिजवले जाऊ शकते. आम्ही याचा वापर करून पाहिला आहे.” तसेच देशातील बऱ्याच भागांमधून त्यांच्या या उत्पादनांना मोठी मागणी असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.