राज्य महिला आयोगाच्यां अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज आळंदी परिसरातील अनधिकृत धार्मिक शैक्षणिक संस्थांवर पुढील 48 तासात कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. आळंदी येथे काही अनधिकृत धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आळंदी पोलीस स्टेशनला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी पुढील 48 तासात अनधिकृत पद्धतीने चालणाऱ्या धार्मिक शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन आणि आळंदी नगरपरिषद प्रशासनाला दिले आहेत. आळंदी परिसरात जवळपास 175 धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था आहेत. यातील काही संस्थांची नोंद धर्मदाय आयुक्त व महिला व बालविकास आयुक्तालयांकडे आहे.