सरत्या वर्षाचे शेवटचा दिवस तसेच शनि अमावस्येनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे लाखो भाविकांनी शनि दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. रात्री बारा वाजेपासूनच शनिशिंगणापूरला श्री शनि देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. शुक्रवारी 7 वाजून 56 मिनिटांनी अमावस्या काळ सुरू झाल्यानंतर पुढील २४ तास शनी अमावस्या समजली जाते. सर्वात जास्त काळ असणारी अमावस्या असल्याने देश विदेशातून भाविक दर्शनासाठी येत आहे. गर्दीचा उच्चांक पाहता शनी देवस्थान व जिल्हा प्रशासनाने भक्तांच्या सोयी-सुविधांसाठी मोठी तयारी केली आहे. वाहतूक व्यवस्थेसह भाविकांना सुलभ दर्शन घेता येईल यासाठी आज व्हीआयपी दर्शनसह चौथऱ्यावरील दर्शन बंद करण्यात आली आहे. अमावस्या पर्वात सात ते आठ लाख भाविक दर्शनास येत असतात. त्यातच सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने भाविकांची गर्दी देखील जास्त राहणार असल्याचे देवस्थानच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले.