कर्जत नगरपरिषद हद्दी मधील गुंडगे गाव आणि आजुबाजूच्या परिसराला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा बाबत अनेक तक्रारी आहेत.त्या तक्रारी नगरपरिषद सोडवत नसल्याने या भागातील महिलांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.दरम्यान,साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मोठा पाठिंबा कर्जत शहरातून मिळत आहे आणि त्यामुळं उपोषण करणाऱ्या महीलांचे मनोधर्य वाढले आहे.
गुंडगे गावातील महिला कालपासून त्यांच्या मागण्यांसाठी नगरपालिका प्रशासना विरोधात साखळी उपोषणास बसलेल्या आहेत. त्यांच्या विभागातील पाणी पुरवठा वितरणाची समस्य,कमी दाबांनी येणारे पाणी,अपुरे पाणी आणि दुपारची वेळ पाणी सोडण्यासाठी निवडण्यात आल्याने महिलांचा रोष निर्माण झाला आहे.शहरातून नोकरी साठी बाहेर पडणाऱ्या महिलांची त्यामुळे गैरसोय झाली असून या समस्या मार्गी लावण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी महिलांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.पाणी मिळावे यासाठी हा महिला कालपासून उपोषणास बसल्या आहेत. तेथील असणाऱ्या समस्यांबाबत योग्य ठिकाणी पाठपुरावा करून लवकरच गुंडगे वासियांच्या समस्या कधी सुटतील असा प्रश्न उपस्थित होते. गुंडगे भागातील चारही प्रमुख भागातील महिलांनी साखळी उपोषण सुरू केले असून या उपोषणाला कर्जत शहरातून पाठिंबा मिळत आहे.कर्जत शहरातील राजकीय पक्षांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.भारतीय जनता पक्षाचे सुनील गोगटे तसेच आरपीआयचे अरविंद मोरे हे महिलांसोबत उपोषण स्थळी थांबून आहेत.