(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला नेहमीच काही ना काही विचित्र आणि अनोखं घडत असल्याचं दिसून येईल. इथे अनेक मजेदार व्हिडिओ शेअर केले जातात जे आपल्या मनोरंजनाचं काम करतात मात्र इथे काही अशी दृश्येही शेअर होतात जी आपल्याला थक्क करून सोडतात. इथे प्राण्यांचीही व्हिडिओ शेअर केले जातात ज्यात त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मात्र एका वासराचा व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला ज्यात तो मृत्यूशी झुंज देताना दिसून आला. व्हिडिओतील दृश्ये सुरुवातील जरा धोकादायक वाटू लागतात मात्र शेवटी वासरू आपल्या ज्याप्रकारे मृत्यूच्या तावडीतून सोडतो ते पाहणे मजेदार ठरते. व्हिडिओत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
पावसाळ्यात अनेक प्राणी अन्नासाठी बाहेर पडतात आणि आपल्या घरात शिरू पाहतात. असाच एक साप अन्नाच्या शोधात एका गोठ्यात गेल्याचे व्हिडिओत दिसून आले. यावेळी गोठ्यात एका वासराला बांधलेले असते. त्याला पाहताच साप त्याच्यावर हल्ला करतो आणि वासराच्या मानेभोवती विळखा घालून त्याला आपली शिकार बनवण्याचा बेत आखतो. मात्र वासरू धीट असतो, तो हार मनात नाही आणि जोरजोरात आपली मान हलवत त्या सापाला आपल्यापसुंद दूर करण्याचा प्रयत्न करतो. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि तो साप त्याच्या मागेवरून खाली पडतो. व्हिडिओच्या शेवटी साप दुसऱ्या वाटेने तेथून जाताना दिसून येतो. पिल्लाची धडपड अखेर सफल होते आणि तो आपला जीव वाचवतोच. आपण कितीही मोठ्या संकटात सापडलो तरी आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे ही शिकवण आपल्याला या व्हिडिओतून मिळते.
पांचट Jokes : डॉक्टर आणि महिलेची प्लास्टिक सर्जरी… वाचाल तर हास्याच्या पुराला बळी पडाल
हा व्हायरल व्हिडिओ @vivek_choudhary_snake_saver नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “महाकालाच्या भक्ताला मृत्यूही काही करू शकत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी गॅरन्टी देतो, तो त्याला काहीच करणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हर हर महादेव”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.