(फोटो सौजन्य: Instagram)
मानवाने जंगलं उद्धवस्त करून तेथे आपलं साम्राज्य उभारलं त्यानंतर अनेक प्राणी पक्ष्यांचं घर हरपलं. अजूनही अनेक जंगल तोडून तिथे नवनवीन शहर उभारली जात आहेत परिणामी प्राणी अन्नासाठी शहरात एंट्री घेतात. अधिकतर जंगली प्राणी हे रात्रीच्या अंधारात गुपचूप आपली शिकार करू पाहतात आणि असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक ब्लॅक पँथर गुपचूप एका श्वानाची शिकार करताना दिसून येत आहे. त्याच्या हल्ल्याला बळी पडलेला कुत्रा जिवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत राहतो मात्र रात्रीच्या या वेळी कोणीही त्याची मदत करत नाही आणि अवघ्या काही क्षणातच ब्लॅक पँथर श्वानाला आपल्या जबड्यात पकडून घेऊन जातो. व्हिडिओतील ही दृश्ये आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून कुत्र्याची ही शिकार तुमच्या अंगावर काटा आणेल. व्हिडिओत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
पांचट Jokes : डॉक्टर आणि महिलेची प्लास्टिक सर्जरी… वाचाल तर हास्याच्या पुराला बळी पडाल
काय घडलं व्हिडिओत?
घटना राजापूर तालुक्यात घडून आली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक ब्लॅक पँथर रस्त्यावरून जात असताना दिसून येतो. यावेळी तो एका घरासमोरून जात असतो जिथे त्याची नजर तिथे असलेल्या कुत्र्यावर पडते. कुत्रा ब्लॅक पँथरला पाहून घाबरतो पण तो पळेल तितक्यात पँथर त्याला आपल्या जबड्यात पकडतो. कुत्रा आपला जीव वाचवण्यासाठी ओरडत राहतो मात्र त्याची मदत करण्यासाठी तिथे कोणीही येत नाही त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच ब्लॅक पँथर कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून तिथून घेऊन जातो. व्हिडिओमध्ये कुत्र्याच्या रडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे जो व्हिडिओच्या शेवटपर्यंत हळूहळू कमी झालेला असतो. हा सर्वच थरार फार भयानक असून याचे फुटेज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे जे वेगाने व्हायरल होत आहे.
शिकारीचा हा थरार @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. याचबरोबर व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुर्मिळ आहे ब्लॅक पँथर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझा गावातील आहे हा झालेला प्रकार..सीसीटीव्ही फुटेज आहेत ते” तिसऱ्या एका युजरने लिहिले आहे, “जंगल तोडला सरकार ने सरकार ला हाना..माणूस जगणं होणार अवघड ह्या पृथ्वीवर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आपण जनावर पाळतो पण त्याची पण काळजी घेतली पाहिजे ना… त्याला पण घरी ठेवले पाहिजे होतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.