तरुणांना स्टंटबाजी पडली महागात; VIDEO व्हायरल झाला अन् पोलिसांनी घेतलं ताब्यात (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
गेल्या काही काळात सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी धोकायदायक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जगभरात अनेक अपघात देखील घडले आहेत. तरीही लोक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता रेल्वे स्टंट, बाईक स्टंट करताना दिसत असतात. विशेषत: यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पोलिस प्रशासनाने वारंवार सुचना देऊनही लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत. यामुळे त्यांच्या जीव किती धोक्यात येऊ शकतो याचे गांभीर्.य अद्याप लोकांना समजलेले नाही.
सध्या असाच एक दोन तरुणांचा धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बेंगळूमधील असून यामध्य दोन तरुण बिनधास्तपणे बाईक स्टंट करताना दिसत आहे. अनेदा यामुळे लोकांचा अपघात झाला असूनही स्टंट करण्याचे प्रमाण थांबत नाहीय. मात्र या तरुणांना बाईक स्टंट करणे चांगलेच महागात पडले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण वाऱ्याच्या वेगाने स्कूटीवरुन जात आहेत. त्यातील एकजण स्कूटी वेगाने पळवत आहे. तर आधून-मधून स्कूटी उचलून स्टंट देखील दाखवत आहे. मागे बसलेला याचा आनंद घेत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्याने पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत त्वरित दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Action-Reaction kinda Kalesh b/w Chappri Riders and Namma Bengaluru Police over doing stunt on Road
pic.twitter.com/0ztoyO1tLL— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 7, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रस्त्यावर स्टंट केल्याबद्दल छप्री रायडर आणि नम्मा बेंगळुरू पोलिसांसोबत कलेशची अॅक्शन-रिअॅक्शन असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा लोकांना वाहन चालवण्याचा परवानाच कसा देण्यात येतो असा प्रश्न अनेकांनी केला आहे. तर काहींनी अशा लोकांना बेदम मारले पाहिजे असे म्हटले आहे. काहींनी या लोकांना घरच्यांचीही काळजी नसते असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.