मुंबईची आण-बाण-शाण असलेला वडापाव कोणाला आवडत नाही. वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव! सामान्यांनाच काय तर मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही हा वडापाव अत्यंत प्रिय आहे. सध्या या वडापावचाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लवकरच नवरा माझा नवसाचा 2 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी ,मुंबईच्या फेमस वडापावचा आनंद लुटला आहे. त्यांचा वडापाव खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.
मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेत ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांनी एकत्र प्रवास केला. प्रवास करताना त्यांनी एका प्रसिद्ध वडापावचा आनंद लुटला आहे. याचा एक व्हिडिओ सचिन पिळगावकरांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडिओला त्यांनी, “माझ्या बाजूला अशोक अन् हातात अशोकचा वडापाव… हा बडाभाव आणि हा वडापाव”, असे म्हटले आहे.
हेदेखील वाचा – आईस्क्रीममधील मानवी बोटानंतर आता चॉकलेटमध्ये बनावटी दात आढळून आले, धक्कादायक घटनेचा Video Viral
अशोक सराफ आणि सचिन पिळगावकरांच्या वडापावचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांना हा व्हिडिओ फार आवडला आहे. त्यांनतर अनेकांना प्रश्न पडू लागला की, या दोन दिग्ग्ज कलालकरांनी नक्की कोणत्या जागेचाच्या वडापाव आस्वाद घेतला तर आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, हे स्पॉट दुसरे तिसरे कोणते नसून कीर्ती कॉलेजच्या समोरील प्रसिद्ध वडापावचे दुकान आहे. या जागेचा वडापाव देशभर प्रसिद्ध आहे. या वडापाव स्पॉटची खासियत म्हणजे, इथे तुम्हाला वडापावसोबत कुरकुरीत चुरादेखील दिला जातो.
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्ग्ज कलाकार आजही आपली मूळ आवड विसरले नाहीत आणि त्यांनी सामान्यांप्रमाणे लुटलेला हा वडापावचा आनंद पाहून अनेकजण सुखावले आहेत. अनेकांनी व्हायरल व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.