(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, यात एक व्यक्ती धावत्या रिक्षाला लटकून स्टंट करताना दिसतो. दरवाजाला लटकत त्याने आपले अर्धे शरीर बाहेर काढलेले असते. व्यक्तीचे संपूर्ण लक्ष हे मागच्या बाजूला असते, रस्त्याच्या समोर त्याचे लक्ष नसते अशातच रिक्षाच्या बाजूने जात असलेल्या एका सायकलस्वाराला तरुणाची जोरदार धडक बसते. ही धडक पूर्णपणे तरुणीच्या चुकीमुळे आणि त्याच्या स्टंटमुळे घडते. या धडकेत वृद्ध सायकस्वार जमिनीवर आदळतो पण यानंतरही रिक्षा थांबत नाही.
तरुण स्टंटबाजी करत पुढे निघून जातो, यावेळी मागून येणारा एक बाईकस्वार आणि अन्य काही प्रवासी सायकलस्वाराची मदत करतात. त्यांनी व्यक्तीला आधी रस्त्यावरुन उठवले आणि मग त्यांची सायकल रस्त्याच्या कडेला काही वेळ उभी केली. निष्काळजीपणा तरुणाचा असला तरी याचा त्रास मात्र सायकलस्वाराला भोगावा लागला. हेच कारण आहे की रस्त्यावरुन जाताना नेहमी रस्ते नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. रिक्षातून असे आपले शरीर बाहेर काढणे आणि नको ते स्टंट करणे फक्त स्वत:च्या जीवाचा धोका वाढवत नाही तर यामुळे इतरांचाही जीव धोक्यात पडतो.
Fun fact: there are no traffic rules in India or whatsoever.
Indians do not abide by any rules or laws. pic.twitter.com/uUUxzYZ1Nx — Manju Asura (@mandate2049) June 28, 2026
व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @mandate2049 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ‘एक रंजक गोष्ट म्हणजे, भारतात वाहतुकीचे कोणतेही नियम नाहीत. भारतीय लोक कोणत्याही नियमांचे किंवा कायद्यांचे पालन करत नाहीत’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “ते अगदी रस्त्याच्या चुकीच्या बाजूनेही गाडी चालवत आहेत. म्हणूनच इथल्या ट्रकचालकांना कशाचीच पर्वा नसते आणि त्यांच्यामुळे रस्त्यावर निष्पाप लोकांचा बळी जातो.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यात अभिमान वाटण्यासारखे काहीही नाही. हे लज्जास्पद आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खरं तर, अत्यंत कमी IQ आणि सिविक सेन्सचा अभाव यामुळे, नियम काय आहेत आणि ते का बनवले गेले आहेत, हे त्यांना समजत नाही. भारतीय लोकच भारताला अशा स्थितीत ढकलत आहेत जिथून सुधारणा करणे अशक्य झाले आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






