(फोटो सौजन्य: X)
हा सर्व थरार पाहून आजूबाजूची लोकही घाबरली आणि आयोजकांनी तरुणाला वाचवण्यासाठी धाव घेतली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृष्ये इतकी थरारक आहेत की पाहून यूजर्सच्या अंगावर काटा आला. सदर घटनेत नक्की काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
बैलाचा थरारक हल्ला
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत बैल अनियंत्रित होऊन व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करताना दिसतो. बैल व्यक्तीला ओढतो, पायदळी तुडवतो आणि काही केल्या त्याला सोडायला तयार नसतो. हा हल्ला इतका जबरदस्त असतो की व्यक्ती जागीच बेशुद्ध होतो. सुरवातील तेथील लोक बघ्याची भूमिक बजावतात पण काहीच क्षणात बैलाची क्रुरता इतकी वाढते की उपस्थितांना व्यक्तीच्या मदतीसाठी धाव घ्यावी लागते. प्रेक्षक हे दृष्य पाहून ओरडत असतात तर आयोजक बैलाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळानंतर लोक व्यक्तीला बैलाच्या तावडीतून सोडवण्यात यशस्वी होतात. या अपघातात रायडर गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार होत असून लवकरात लवकर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा आहे.
BULL ATTACK: A 25-year-old man was injured after being bucked off a bull and then stomped on by the animal during a rodeo event in the Bronx. – https://t.co/sXw57qqvRc#News12NY #Bronx pic.twitter.com/LttvKeH1g9 — News 12 New York (@News12) June 30, 2026
मित्राने व्यक्त केले दु:ख
या दु:खद घटनेवेळी घायाळ रायडरचा मित्र देखील तिथे उपस्थित होता. या घटनेची माहिती देताना त्याने ‘द पोस्ट’ला सांगितले की, “”माझा मित्र गंभीर जखमी झाला आहे. तो बैलावर आपले काम व्यवस्थित करत होता, पण नंतर बैल गोल गोल फिरू लागला ज्यामध्ये तो वाईटरित्या अडकला. त्याला वरून जोरदार फटका बसला, मग तो खाली पडला, चिरडला गेला आणि बेशुद्ध झाला. तो लवकर बरा व्हावा अशीच माझी इच्छा आहे.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






