गई भैंस पाणी में नही... छत पर! पाहून तुम्हीही हादराल, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून हसू आवरणार नाही; Video Viral
सोशल मीडियाचे जग खूप वेगळे आहे. रोज इथे अनेक निरनिराळ्या गोष्टी पाहायला मिळतात ज्याआधी लोकांनी कधीही पाहिलेल्या नसतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही असे अनेक व्हायरल व्हिडिओज आजवर आपल्या फीडवर पाहिले असतील. सोशल मीडियावर प्रत्येक स्क्रोलनंतर, एक पोस्ट दिसते जी एखाद्या व्यक्तीला आश्चर्यचकित करते. व्हिडिओमध्ये एक तर एक अतिशय अनोखा जुगाड पाहायला मिळेल किंवा लोक असे काही करताना दिसतील जे यापूर्वी कधीही न पाहिलेले असेल. इथे अशा अनेक गोष्टी व्हायरल होत असतात ज्या अनेकदा लोकांना कोड्यात टाकतात. सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्ये तुम्हाला थक्क केल्याशिवाय राहणार नाहीत.
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खूपच छोटा आहे पण चकित करायला पुरेसा आहे. तुम्ही आजवर अनेकदा प्रत्यक्षात किंवा फोटोत अथवा व्हिडिओत म्हैस पाहिली असेल. हा प्राणी अधिकतर खेड्यात पाळला जातो. आता म्हैस ही जमिनीवर वास्तव करणारी प्राणी आहे अशात तुम्ही हिला अचानक अवकाशात पाहिले तर तुम्हाला कसे वाटेल? सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एक म्हैस चक्क घराच्या छतावर उभे असल्याचे दिसून आले आहे. या प्रकाराने आता सर्वजण अचंबित झाले असून अनेकांच्या मनात आता ही म्हैस तिथे कशी गेली असावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय दिसले व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका खेड्यातील घरांप्रमाणेच कच्चा घराच्या छतावर एक म्हैस बसलेली दिसत आहे. त्याचा व्हिडिओ बनवताना लोक बाहेर उभे राहून ओरडत आहेत. काही वेळाने त्यांचा आवाज ऐकून घरात उपस्थित असलेली महिलाही घरातून बाहेर निघून येते. मात्र ही म्हैस आता घराच्या छतावर कशी गेली याचे गूढ काय शेवटपर्यंत व्हिडिओत दाखवण्यात आले नाही. असे असले तरी लोक आता या व्हिडिओची जोरदार मजा घेत आहेत. असे म्हशीला क्विचितच कोणी छतावर पाहिले असावे ज्यामुळे लोक आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
मित्र आहे की वैरी! लग्नमंडपात आला, कानात कुजबुजला अन् क्षणार्धात मोडलं लग्न; धक्कादायक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @soljardhurv नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या मजेदार प्रतिक्रियाही यावर व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “म्हैस पाण्यात गेल्याचे ऐकले होते मात्र छतावर गेल्याचे कधी ऐकले नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हशीला खाली कसे उतरवायचे असा प्रश्न लोकांना पडला असेल पण मला ही म्हैस छतावर गेली कशी असा प्रश्न पडत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.