(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आजकाल, प्राण्यांचे मजेदार आणि धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यात कधी त्यांच्यातील मिश्किल मस्ती दिसून येते तर कधी थरारक लढत. नुकताच एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात दोन साप आपापसात भांडताना दिसत आहेत. या अनोख्या लढतीत दोन्ही साप एकमेकांवर विषारी हल्ला करतात मात्र याचा शेवट अनेकांना थक्क करून जातो. नक्की या लढाईत काय घडते आणि कोणाचा कोणावर विजय होतो ते जाणून घेऊयात.
मुळातच साप हा एक भयानक आणि धोकादायक प्राणी आहे. साप आपल्या विषासाठी आणि त्याच्या विषारी हल्ल्यासाठी ओळखला जातो. त्याचे विष कुणालाही क्षणार्धात मृत्यूच्या दारी पोहचवू शकते. अनेकदा जंगलाचा राजा देखील सापाला बघून आपली वाट पाहत असतो. अशात एका सापाची दुसऱ्या सापाशी युद्ध झाले तर यात नक्की कोणाचा विजय होईल हे पाहणे फार मनोरंजक ठरते.
मित्र आहे की वैरी! लग्नमंडपात आला, कानात कुजबुजला अन् क्षणार्धात मोडलं लग्न; धक्कादायक Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मोठा साप दुसऱ्या छोट्या सापावर हल्ला करत आहे. छोटा सापही मागे हटत नाही आणि पुन्हा हल्ला करतो. हे दृश्य इतके रोमांचक आणि विचित्र आहे की लोक ते पुन्हा पुन्हा पाहत आहेत. काहीजण याला सापांसाठी मजा मानत आहेत, तर काहीजण याकडे धोकादायक लढाई म्हणून पाहत आहेत. हा व्हिडिओ सापांच्या अनोख्या सवयी तर दाखवतोच पण त्यांच्या जगाची झलकही देतो.व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी याला आश्चर्यकारक, तर काहींनी अतिशय मजेदार म्हटले.
View this post on Instagram
A post shared by Shubham and Uma kumar (@shubham_uma_snake_saver_ranchi)
दरम्यान सापांमधील या थरारक लढतीचा व्हिडिओ @shubham_uma_snake_saver_ranchi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओला पाहिले आहे तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खेळत आहे का? हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोब्रा खूप रहस्यमय आणि मंत्रमुग्ध करणारे आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.