(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला दु:खी होऊन आपल्या डोक्याला हात लावून बसल्याचे दिसते. यावेळी तिच्या समोर बेडवर खूप साऱ्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा पडलेल्या असतात. या सर्व नोटा जुन्या असल्याने आता त्या निरुपयोगी आहेत आणि हाच विचार करुन महिला खंत व्यक्त करत असते. खरंतर या नोटा तिने आपल्या पतीपासून लपवून ठेवलेल्या असतात पण ती स्वत:च ही गोष्ट विसरते आणि तब्बल नऊ वर्षांनंतर जेव्हा या नोटा तिला घरात सापडतात तेव्हा तिला याचे वाईट वाटते की तिने लपवून ठेवलेले पैसे आता कोणत्याच कामाचे राहिलेले नाही. हा विचार करुन ती भावूक होते आणि तिची मुलगी हे सर्व दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करते. मुलगी व्हिडिओत कुणाला हे पैसे पाहिजे असल्यास तिला मेसेज करा असं सांगते.
हा व्हिडिओ @ayushidixit___ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काकू तुम्हाला नऊ वर्षांनंतर ही गोष्ट आठवली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आरबीआयशी जाऊन चर्चा करा, कदाचित नोटा बदलून मिळतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला काकांची प्रतिक्रिया पाहायची आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






