
सिया गोयल प्रकरणातून घेतला धडा, ट्रेंकिंगला गेलेल्या जोडप्याने केलं असं... पाहून यूजर्सना हसू झालं अनावर; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
पावासाळ्याच्या दिवसांत अनेक लोक ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करतात. पण केतन-सिया प्रकरणात या ट्रेकिंग दरम्यानच सियाने केतनच्या हत्येचा कट रचला. भूतकाळातील या घटनेला लक्षात ठेवत जोडपे फिरायला तर गेले पण त्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. व्हिडिओमध्ये कॅमेरामॅन पुढे जात एका जोडप्याजवळ थांबतो. तो त्यांना आवाज देत त्यांनी लढवलेली शक्कल सर्वांना दाखवायला सांगतो ज्यानंतर पती आपला हात वर करतो. खरंतर पती आण पत्नी दोघांनीही आपल्या हातांना एका ओढणीने बांधलेले असते. याचाच अर्थ त्या ओढणीच्या मदतीने ते दोघेही एकमेकांना जोडलेले असतात. अशात जर एकानेही नकळत दुसऱ्याला त्रास देण्याचा किंवा ढकलण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्यालाच लगेच याची माहिती मिळेल.
दुसऱ्या दृष्टीक्षेपातून जर एकाने दुसऱ्याला ढकलण्याचा प्रयत्न केला तर एकत्रित बांधलेले असल्याने दुसरा व्यक्तीही त्याच्यासोबत खोल दरीत पडण्याची शक्यता आहे. हेच कारण आहे की दोघांनीही आपल्या हातांना एका ओढणीने बांधत हे एक संरक्षण कवच स्वत:साठी तयार केले. सोशल मिडियावर जोडप्याच्या या आयडीयावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहीजण त्यांची ही भिती पाहून त्यांच्यावर हसत आहेत तर एकमेकांवर विश्वास नाही तर एकत्र फिरायला आलेच कशाला असेही काहीजण म्हणत आहेत.
Couple ties hands together with dupatta during hill trek. pic.twitter.com/71OEXi85iP — Manip0 (@magbhu55) July 6, 2026
हा व्हिडिओ @magbhu55 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, डोंगरावरील ट्रेकदरम्यान जोडप्याने ओढणीने एकमेकांचे हात बांधले’. २ लाखाहून अधिक व्ह्यूज व्हिडिओला मिळाल्या असून अनेकांनी कमेंट करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “जेव्हा दोघांचा एकमेकांवर विश्वास नसतो, पण सहल जास्त महत्त्वाची असते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काय मूर्खपणा आहे! ट्रेकिंग किंवा हायकिंगचा पहिला नियम हा आहे की तुमचे दोन्ही हात रिकामे असले पाहिजेत.”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बरोबर आहे भावा..कल्पना भारी आहे….ती तुला ढकलण्याचा विचारही करू शकत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.