(फोटो सौजन्य: Instagram)
कंटेंट क्रिएटर प्रियम सारस्वत याने या घराचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला असून त्याने घराचा मालका रवि होंगल यांच्यासोबत मिळून घराचा संपूर्ण टूर देखील केला. घरात प्रवेश करताच तुम्हाला एक मोठे कपाट दिसेल, जिथे रवीने आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत वापरलेले सर्व जुने कॅमेरे आणि लेन्स जपून ठेवले आहेत.
कॅमेराच्या लेन्ससारखी खिडकी
या घराला फक्त बाहेरुनच कॅमेरासारखे तयार करण्यात आले नसून आतूनही याची रचना हुबेहुब कॅमेरासारखी करण्यात आली आहे. घरातील स्वयंपाकघरात एक अशी खिडकी बसवण्यात आली आहे जिला बाहेरुन पाहताच तो कॅमेराचा मोठा लेन्स असल्याचा भास होतो. याशिवाय घरातील बाल्कनीत देखील एक असे रोलींग बसवण्यात आले आहे जे जुन्या काळातील एका फिल्म रोल्ससारखे दिसते. इतकेच नाही तर घरातील प्रत्येक पायऱ्यांवर तुम्हाला कॅमेरा आणि फोटोग्राफीशी निगडीत एक सुंदर मेसेज लिहिल्याचे दिसून येईल. घरातील गेस्ट रुम देखील गूगल फोटोजच्या (Google Photos) थीमवर तयार करण्यात आले आहेत. घरातील भिंतींवरही कॅमेराच्या SD कार्डची डिजाईन तयार करण्यात आली आहे.
मुलांची नावही आहेत कॅमेरांपासून प्रेरित
रवि होंगल यांचे कॅमेराप्रेम इतके आहे की, त्यांनी आपल्या मुलांची नावे देखील कॅमेरांच्या नावांवर ठेवली आहेत. रवीने आपल्या तिन्ही मुलांची नावे जगप्रसिद्ध कॅमेरा आणि प्रिंटर कंपन्यांच्या नावांवरून ठेवली आहेत. त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव कॅनन , मधल्या मुलाचे नाव निकॉन तर धाकट्या मुलाचे नाव एप्सन असे ठेवण्यात आलंय.
View this post on Instagram
घराला बनवण्यात आला ७१ लाखांचा खर्च
सांगितले जात आहे की, या अनोख्या घराला तयार करण्यासाठी मालकाला साधारण ७१ लाखांचा खर्च आला. घराची डिजाईन इतकी वेगळी आणि आकर्षित आहे की त्या परिसरातील लोकांसाठी हे घर म्हणजे एक सेल्फी पाॅईंट झाले आहे. इथून जाणारे अनेक लोक जेव्हा या घराला पहिल्यांदा पाहतात तेव्हा त्यांची नजर या घरावरुन हटत नाही. अनेकजण या घराजवळ जाऊन सेल्फी देखील क्लिक करतात. या अनोख्या घराचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच ट्रेंड करत असून फक्त एका दिवसात याच्या व्हिडिओला करोडोंहून अधिकचे व्हूज मिळाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






