Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ती जिममध्येम साफसफाई करण्यासाठी आली होती. पण त्या दिवशी तिने जे केलं त्याने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तो व्हिडीओ बघून तुम्हाला पण नक्कीच प्रेरणा मिळेल
एका जिममध्ये एक महिला साफसफाईचं काम करतात. शिक्षण कमी हाताला काम पाहिजे म्हणून जिममध्ये साफ-सफाईचे काम करत होती. काम संपल्यावर तिला जिममधल्या मशीनकडे बघून कुतूहल वाटलं. ज्या मशीनवर लोक घाम गाळतात. स्वत: कधी ट्राय नव्हतं केलं. पण हिम्मत केली आणि तिथे असलेल्या क्रॉस-ट्रेनर मशीनजवळ त्या गेल्या. हळू हळू त्या मशीनवर चढल्या आणि चालायचा प्रयत्न करू लागल्या.
सुरुवातीला त्यांना थोडं अवघड गेलं, पण त्यांनी हार मानली नाही. पूर्ण उत्साहाने, जिद्दीने त्या मशीनवर व्यायाम करू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. एखाद्या लहान मुलाला नवीन खेळणं मिळाल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद मिळत आहे.
हा सगळा प्रकार त्या जिममधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. नंतर जिमच्या मालकाने किंवा तिथल्या कोणीतरी तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. वय फक्त एक आकडा आहे हे या महिलांनी आजींनी दाखवून दिलं की वय हे फक्त एक आकडा आहे. शिकण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल तर वय आडवं येत नाही.
She came to clean the gym, but left everyone inspired.
After finishing her work, an elderly woman tried the cross-trainer with full enthusiasm — a beautiful moment of determination captured on CCTV.#Inspiration #FitnessMotivation #WomenPower #Motivation #Heartwarming pic.twitter.com/TldkyKWfCZ — Manchh (@Manchh_Official) September 6, 2026
आपण नेहमी म्हणतो की आता आमचं वय झालं, आम्हाला जमणार नाही. पण या आजींनी त्या विचाराला छेद दिला आहे.त्या फक्त साफसफाई कामगार होत्या. त्यांना कोणी सांगितलं नव्हतं की मशीनवर जा. पण त्यांच्या मनात आली ती इच्छा आणि त्यांनी ती पूर्ण केली. त्यांचा तो दृढनिश्चय, तो आत्मविश्वास बघण्यासारखा आहे.
आजकाल तरुण मुलं जिमला जायचा कंटाळा करतात, निमित्त शोधतात. पण या आजी काम संपवून सुद्धा एवढ्या उत्साहाने व्यायाम करत आहेत.सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षावव्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. कोणी म्हणतंय की या आजी खऱ्या प्रेरणा आहेत, तर कोणी म्हणतंय की त्यांच्या जिद्दीला सलाम. अनेकांनी लिहिलं आहे की, आम्हाला पण या आजींकडून शिकायला हवं. काम कोणतंही छोटं नसतं आणि शिकण्याला वय नसतं हे त्यांनी दाखवून दिलं.खरंच, हा व्हिडीओ फक्त एका जिमचा व्हिडीओ नाही तर एक प्रेरणा आहे. तो आपल्याला सांगतो की आयुष्यात नेहमी उत्साही राहा.
नवीन गोष्टी ट्राय करत राहा. कधी कोणती गोष्ट तुम्हाला आनंद देऊन जाईल सांगता येत नाही. त्या आजींनी त्या दिवशी फक्त क्रॉस-ट्रेनर वापरला नाही तर लाखो लोकांना एक नवा विचार दिला.आज त्या जिममध्ये काम करणाऱ्या आजी स्टार झाल्या आहेत. सगळीकडे त्यांचंच कौतुक होतंय. आणि ते कौतुक त्यांनी मिळवलं पण आहे. कारण त्यांनी दाखवलेली जिद्द आणि उत्साह खरंच वाखाणण्याजोगा आहे.






