Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हा व्हिडीओ divyadj762 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झाला आहे. व्हिडीओमध्ये एक छोटीशी शाळकरी मुलगी दिसतेय. जी आपल्या शिक्षिकेसाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आली आहे. गिफ्टचं पॅकिंग पण तिने स्वतःच केलं आहे. एका कागदात काहीतरी गुंडाळून त्यावर स्केचपेनने तिने ‘हॅप्पी टीचर्स डे’ असं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. Teachers Day Viral Video:
तिचं ते निरागस प्रयत्न बघूनच खूप क्युट वाटतं .ती शिक्षिकेजवळ जाते आणि त्यांना गिफ्ट देते. पण गिफ्ट देताना ती म्हणते ‘हॅप्पी चीटर डे’. तिचा उच्चार चुकतो. टीचर्सच्या ऐवजी ती चीटर म्हणते. तिचा तो गोड उच्चार ऐकून शिक्षिका पण हसते. पण तिने तिला रागवण्याऐवजी खूप प्रेमाने समजावलं. ‘चीटर नाही बाळा, टीचर’ असं म्हणून तिने तिची चूक दुरुस्त केली. Viral Video:
View this post on Instagram
त्या गिफ्टमध्ये एक छोटंसं हाजमोलाचं पॅकेट होतं . चिमुकलीने आपल्या शिक्षिकेसाठी आणलं त्यामागची तिची भावना खूप मोठी होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता.नेटकऱ्यांना व्हिडीओ खूप आवडलाहा व्हिडीओ समोर येताच लोकांनी त्यावर भरभरून प्रेम दिलं आहे. कमेंटमध्ये सगळे त्या चिमुकलीचं कौतुक करत आहेत.
शिक्षिकेने पण ज्या पद्धतीने तिला समजावून सांगितलं, त्याचं पण लोक शिक्षिकेचे सुद्धा कौतुक करत आहेत. चिमुकलीला पण शिक्षिकेबद्दल खूप आदर होता म्हणून ती गिफ्ट घेऊन आली. उच्चार चुकला तरी भावना पोहोचल्या.शिक्षक दिनाच्या दिवशी असे अनेक छोटे-छोटे व्हिडीओ समोर येतात, पण हा ‘हॅप्पी चीटर डे’ वाला व्हिडीओ सगळ्यांच्या मनात घर करून गेला आहे. तुम्ही पण हा व्हिडीओ बघितला नसेल तर एकदा नक्की बघा, तुमचा दिवस गोड होऊन जाईल.
![]()
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता https://www.navarashtra.com/ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)






