दिवाळीचा सण अखेर सुरु झाला आहे. हा सण दिव्यांच्या प्रकाशाचा आणि आनंदाचा! या सणात लोक फटाके फोडून आपला आनंद व्यक्त करतात. मात्र असे करताना आपली आणि इतरांची काळजी घेणे फार महत्तवाचे ठरते. दिवाळी सुरु झाली की, फटाक्यांमुळे झालेल्या अपघातांच्या अनेक बातम्या समोर येत असतात. फटाके फोडताना आपण केलेला निष्काळजीपणा आपल्या जीवावर देखील बेतू शकतो. लोकं कोणताही विचार न करता वाटेल तसे आणि वाटेल तिथे हे फटाके फोडतात आणि मग नको ते घडून बसते. सध्या यासंबंधीचाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिवाळीत फटाके फोडताना आपण प्राण्यांच्या आजूबाजूला किंवा समोर फटाके फोडणे टाळले पाहिजे. फटाक्यांच्या आवाजाने किंवा तेजस्वी प्रकाशाने प्राणी घाबरतात किंवा संतप्त होतात. त्यामुळे आपण हे अजिबात करू नये. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासमोर घराबाहेर फटाके फोडू लागतो. त्यानंतर घाबरलेला कुत्रा फटाका घेऊन त्याच व्यक्तीच्या घरात घुसतो. पुढे काय होईल ते पाहून तुम्हाला थोडं हसू येईलच पण कुत्र्याच्या अवस्थेची दयाही येईल.
हेदेखील वाचा – तरुणीच्या गळ्याभोवती घातला सापाने विळखा, तरुणीने केलं असं पाहून तुमचाही उडेल थरकाप, Video Viral
तर व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या घराबाहेर रस्त्यावर फटाके पेटवताना दिसत आहे. दरम्यान, त्याचा पाळीव कुत्रा तोंडात फटाका घेऊन घरात जातो. हे पाहून घरातील लोक घाबरतात आणि व्यक्तीही घाबरतात. त्यानंतर लगेच विचार न करता ती व्यक्ती लगेचच फटाका उचलून घराबाहेर ठेवते. यानंतर लगेचच कुत्रा फटाका घेऊन त्याच्याच कुत्र्याच्या घरात परत जातो. श्वानगृहात कुत्रा घुसल्यानंतर काही काळ हा फटका जोरदार फुटू लागतो. फटका संपूर्ण फुटून झाल्यानंतर हा कुत्रा बाहेर येतो मात्र यावेळी तो भयंकर घाबरलेला असतो. फटका तोंडात घेतल्याने निश्तितच त्याला दुखापत झाली असावी. मात्र या व्हिडिओनंतर आता ही चूक त्या व्यक्तीची की कुत्र्याची? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Bro is not in danger, Bro is danger 🔥 pic.twitter.com/MDvB8wXpv6
— Voice of Hindus (@Warlock_Shabby) October 30, 2024
हेदेखील वाचा – आता तर हद्दच झाली! कुत्र्याने नाही तर माणसानेच घेतला श्वानाचा चावा, धक्कादायक घटनेचा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @Warlock_Shabby नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे आणि 16 हजार लोकांनी लाइक्स दिले आहेत. तसेच अनेकांनी कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” बरं झालं कोणाला काही दुखापत नाही झाली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो ठीक आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कुत्र्यांसोबत असे नका करू हे पण जीव आहेत, त्यांनाही वेदना होतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.