(फोटो सौजन्य: Instagram)
पाऊस असो वा ऊन भारतात क्रिकेटची क्रेझ इतकी आहे की लोक कोणत्याही ऋतूत हा खेळ खेळणं बंद करत नाहीत. भारतीय लोकांच्या नसानसांत क्रिकेट भरलेला आहे. अशात क्रिकेटसंबंधित एक मजेदार आणि अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जो सर्वांचे आश्चर्यचकित करत आहे. व्हिडिओमध्ये काही मुलं क्रिकेट खेळताना दिसून येत आहे मात्र यात सर्वात लक्षवेधी ठरले ते गजराज! व्हिडिओमध्ये मुलांसोबत हत्ती क्रिकेट खेळताना दिसून आला ज्याला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला. हत्तीला असे खेळताना पाहून सर्वच थक्क झाले, एवढेच काय तर यात तो आपल्या सोंडेने बॅट पकडत षटकार मारतानाही दिसला ज्याने या व्हिडिओची मजा आणखीनच द्विगुणित केली. व्हिडिओ आता युजर्सना सुखावत असून लोक गे दृश्य वेगाने शेअर करत आहेत.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक हत्ती बॅट घेऊन भरपावसात क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तो आपल्या सोंडेत धरलेल्या बॅटने चेंडू मारत षटकारांचा वर्षाव करताना दिसून आला. हास्य आणि मजेने भरलेल्या या अनोख्या सामन्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचे मन आनंदाने भरून गेले. क्रिकेट खेळत असलेले हे गजराज यावेळी इतके क्युट दिसत होते की त्यांच्या या कृतीने सर्वांनाच घायाळ करून सोडले. हत्ती हा मुळातच जंगलातील एक विशालकाय प्राणी आहे मात्र या प्राण्याचे शरीर जितके मोठे आहे त्याहून मोठं त्याच मन आहे. अधिकतरवेळी हत्ती हे शांत असतात आणि माणसांसोबत ते नेहमीच मिळून मिसळून राहतात.
क्रिकेट खेळणाऱ्या गाजराजांचा हा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत बरेच व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप छान गजराज” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाबर आझमपेक्षा चांगला खेळला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “युवराज सिंग नाही हा तर गजराज सिंग” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “गज्जू तर फुल फॉर्ममध्ये आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.