नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून मनोरमा खेडकर यांचा शोध सुरू केला होता. मात्र मनोरमा खेडकर या पोलिसांना अजूनही मिळाल्या नाहीत. कोर्टातून जामीन मिळवला मात्र पोलिसांनी तपासात सहकार्य करावं ही मागणी केली होती. यासाठी नवी मुंबई पोलिसांना चौकशीला हजर राहावे म्हणून नोटीस लावण्यात आली होती. मात्र लावलेली नोटीस फाडण्यात आली. बंगल्याला चिकटवलेली नोटिस फाडली त्यामुळे पुन्हा एकदा मनोरमा खेडकर यांचा पराक्रम पुढे आला आहे.
काय आहे प्रकरण ?
मनोरमा खेडकर यांनी क्लीनरच अपहरण केल म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलीस तपास करत होते. मात्र अजूनही खेडकर पोलिसांना मिळाली नाहीत. कोर्टात जामीन मिळाला मात्र अजूनही खेडकर या पोलिसांना मिळाल्या नाहीत. कोर्टात जामिन मिळवताना त्यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याची माहिती त्यांनी लपवली आहे. चौकशीला सहकार्य करण्यात येत नाही लावलेली नोटिस पण फाडण्यात आली आहे.
अपहरण कस केल होत ?
नवी मुंबई रस्त्यावर मिक्सर आणि एका गाडीचा अपघात झाला होता. अपघात झाल्यावर हेल्परला गाडीत बसवल आणि तो हेल्पर थेट पूजा खेडकर यांच्या घरी निघाला. रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची केस दाखल झाल्यावर शोध घेतल्यावर अपहरण केल्याचं समजलं. आरोपी आणि मनोरमा खेडकर यांचा संबंध काय आहे, हे पोलिसांना तपास करायचा होता मात्र अजूनही मनोरमा खेडकर हिचा शोध लागला नाही.
मनोरमा खेडकरचे कारनामे
हे सगळे कारनामे मनोरमा खेडकरचे आहेत. पोलिसांना या सगळ्या प्रकरणांचा तपास करायचा आहे. मात्र पोलिसांनी लावलेली नोटिस पुन्हा एकदा फाडण्यात आली आहे.
चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची निर्घृण हत्या
नवीमुंबई येथील करावे गावातून एक धक्कदायक हत्येची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एनआरआय पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे. मात्र या घट्नेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?