फोटो सौजन्य - Social Media
गुप्तचर विभाग (IB)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. सिक्युरिटी असिस्टंट पदासाठी रिक्त असणाऱ्या पदांसाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात नोंद दर्शवली. त्यानंतर नियुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्याची पहिली परीक्षा २९ व ३० सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या अफाट होती. पाच विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. या विषयांमध्ये सामान्य ज्ञान (General Awareness), गणितीय क्षमता (Quantitative Aptitude), बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning), इंग्रजी भाषा (English Language), तसेच सामान्य अध्ययन (General Studies) या पाच विषयांचा समावेश होता.
या भरतीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. तसेच या संबंधित उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही या परीक्षेला हजर राहिले असाल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे, तुमचा निकाल पाहू शकता:
या परीक्षेत मिळालेल्या गुणांची मोजणी दरम्यान बरोबर उत्तराला अधिक १ गुण देण्यात येईल. तर चुकीचे उत्तर दिल्यास 0.25 गुण कापले जातील. एकंदरीत, या संपूर्ण गुण मोजणीचे सूत्र पुढील प्रकारे आहे:
= (बरोबर उत्तर × 1) − (चुकीचे उत्तर × 0.25)
हरकती नोंदवणे (Objections) :
निवड प्रक्रिया (Selection Process) :