(फोटो सौजन्य: X)
प्राण्यांचे जग हे मानवांच्या जगातून बरेच वेगळे असते. इथे अनेक रंजक आणि थरारक गोष्टी घडून येत असतात ज्या आपल्या नजरेपल्याड असतात. आपल्यात जशी भांडण, बाचाबाची होते तसेच काही प्राण्यांमधयेही घडत असते. अनेकदा प्राणी आमने-सामने येतात आणि मग त्यांच्यात सुरु होते संघर्षाची लढाई. लढाईचे हे दृश्य अनेकदा लोकांना थक्क करून जाते. आताही दोन घोरपड्यांमधील मजेदार युद्ध सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते ज्या प्रकारे व्हिडिओत भांडत आहेत ते पाहून अनेकांना ती फाइट WWE फाइट असल्यासारखीच वाटली. लोकांनी या दृश्यांची चांगलीच मजा लुटली आणि हे दृश्य शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात दोन घोरपडी रस्त्याच्या मधोमध लढताना दिसून आल्या .राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे हा प्रकार घडून आला. दोन घोरपडी आमने-सामने आल्या आणि मग काय त्याच्यात सुरु झाले एक भयंकर युद्ध. दोघीही एकमेकांकडे बघत होत्या आणि तितक्यात एकमेकींची मन पकडत एकीने दुसरीला जमिनीवर आपटलं. हे दृश्य अक्षरशः WWE फाइट सारखे दिसून येत होते ज्यात दोन घोरपडी लढत आहेत. बराच काळ त्यांच्यात हे युद्ध सुरु असतं आणि व्हिडिओच्या शेवट्पर्यंत त्या एकमेकांना काही सोडताना दिसून येत नाहीत. लढाईचे हे दृश्य लोकांना आता चांगलेच आवडले असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
माहितीनुसार, घोरपड्यांची ही लढत पाहून काहींनी वन विभागाला याची माहिती दिली मात्र वन विभाग घटनास्थळी पोहचेल याच्या आधीच दोन्ही घोरपडी तेथून पळून जंगलात निघून गेल्या. घोरपडी या फार शक्तिशाली आणि चपळ असतात त्यांच्या शक्तीपुढे अनेकदा विषारी सापही घाबरून पळू लागतो. प्राण्यांमधील ही अनोखी लढत आपल्याला निसर्गाच्या शक्तीची जाणिव करून देते. घोरपडी अनेकदा अन्न किंवा प्रदेशासाठी आपापसात भांडत असतात. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले, “कोल्हापूरच्या असतील मनून खेळत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी पहिल्यांदा असं काही पाहिलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.