(फोटो सौजन्य: Instagram)
‘उपर वाला जब भी देता, देता छप्पर फाड के’ हिंदी चित्रपटाचा हा डायलॉग तर तुम्ही अनेकदा ऐकला असेल मात्र याचे जिवंत उदाहरण तुम्हाला आजच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. सध्या सोशल मीडियावर नशिबाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे प्राण्यांच्या शिकारीचेही दृश्य दिसून येतात. सिंह हा जंगलाचा राजा आहे, आपल्या शक्तीने तो कुणाचीही शिकार करू शकतो. मात्र आताच्या व्हिडिओमध्ये सिंहदेखील हादरला असल्याचे दिसून आले. चला व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक सिंह झाडाखाली आराम करत असल्याचे दिसते. तो झाडाखाली बसणार तितक्यात झाडावरून एक प्राणी जोरदार जमिनीवर आपटतो. ही सर्व घटना इतक्या वेगवान स्वरूपात होते की काही क्षणासाठी सिंह देखील हादरून जातो, त्याला प्रश्न पडतो की नक्की झालं काय… परिश्रमाच फळ कधी ना कधी मिळत हे तर तुम्ही ऐकलं असेल मात्र विना परिश्रम फळ कसं मिळत हे तुम्हाला व्हिडिओत पाहता येईल. कोणतीही मेहनत न घेता सिंहाला फ्रीमध्ये त्याच अन्न मिळत. सिंहासोबतचा हा भाग्यवान क्षण तेथील एका पर्यटकाने आपल्या कॅमेरात कैद केला आणि याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, झाडावर बिबट्याने एका मृत हरणाला लपवून ठेवले होते मात्र अचानक त्याची ही शिकार खाली पडते आणि सिंहाच्या तावडीत सापडते. सिंहसोबतची ही चमत्कारी घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे, लोक सिंहाच्या नशिबाचे कौतुक करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @wildliferescuers नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा सिंहाचा सर्वात भाग्यवान दिवस आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिचारा बिबट्या परत येईल आणि त्याचे अन्न शोधेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सिंह देवाचे आभार मनात असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.