Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

… यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

Misbehave With Foreign Tourist : रस्त्यावर तरुणांचा थिल्लरपणा! परदेशी महिला पर्यटकासोबत केले चुकीचे वर्तन, पाहून यूजर्सचा चढला पारा. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2026 | 03:24 PM
... यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

... यामुळेच होतेय देशाची बदनामी! मनालीत परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन, CCTV कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • परदेशी पर्यटकांसोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
  • अशा घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसह देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
आपण कसे वागतो यावरुन आपली ओळख होत असते. लहान मुलांनी चुका केल्या की समोरच्या व्यक्तीकडून ओरडा थेट त्याला दिला जात नाही तर आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर टिका केली जाते. लहानपणी आपण या गोष्टीचा अनुभव नक्कीच घेतला असेल. याचप्रमाणे, जेव्हा आपण परदेशात जातो किंवा आपल्या देशात आलेल्या परदेशी नागरिकांशी कसे वागतो, यावरून केवळ आपलेच नव्हे तर संपूर्ण देशाचे मूल्यांकन केले जाते.

आयुष्य घर सांभाळण्यात गेलं! 87 वर्षांनंतर आज्जींनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून यूजर्सचे डोळे पाणावले; Video Viral

दुर्दैवाने, भारतात आलेल्या काही विदेशी पर्यटकांना, विशेषतः महिलांना, काही असामाजिक प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. अशा घटना केवळ संबंधित व्यक्तीची प्रतिमा खराब करत नाहीत, तर परदेशी पर्यटकांच्या मनात संपूर्ण देशाबद्दल नकारात्मक आणि भीतीदायक चित्र निर्माण करतात. याच पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात भारतात फिरायला आलेल्या महिला पर्यटकासोबत काही व्यक्तींनी चुकीचे वर्तन केल्याचे उघडकीस आले. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यूजर्सद्वारे घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओ फक्त ३६ सेकंदाचा असला तरी यातील दृष्ये कुणाचाही राग अनावर करण्यास पुरेशी आहेत. व्हिडिओमध्ये विदेशी पर्यटक गजबजलेल्या रस्त्यावरून चालताना दिसतात. लाल टी-शर्ट घातलेला एक तरुण हसत हसत पुढे येतो आणि लगेच मागे वळतो. टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेले आणखी दोन तरुण दुसऱ्या बाजूने येतात. त्यानंतर, पांढरा टी-शर्ट घातलेला एक तरुण पुढे येतो आणि त्याच्या समोरून चालणाऱ्या एका परदेशी महिला पर्यटकाला स्पर्श करुन पुढे निघून जातो. आपल्यासोबत चुकीचे झाले आहे हे समजताच पर्यटक मान वळवते पण व्यक्ती पुढे निघून गेल्याने तिला काहीच करता येत नाही. या व्हिडिओतून स्पष्ट होते की, देशात महिला रात्रीच काय तर दिवसाढवळाही अशा लांडग्यांपासून सुरक्षित नाहीत. ही घटना ४ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.

These guys need serious kutai fr😡 https://t.co/6IZhpXw962 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 4, 2026

पावसासाठी घोड्यांची भन्नाट तयारी! शिमल्याच्या रस्त्यांवर रेनकोट घालून फिरले, दृष्य पाहून नेटकरी झाले खुश; Video Viral

दरम्यान घटनेचे सीसीटिव्ही फुटेज @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘यांना खरंच चांगला चोप दिला पाहिजे’. व्हिडिओला लाखो यूजर्सने पाहिलं असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “ते ज्या ठिकाणाहून येतात, तिथे अशा गोष्टी कदाचित नित्याच्याच असतील. केवळ अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण न ठेवल्यामुळे भारताचे पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना पृथ्वीवर राहण्याचा अधिकार नाही, त्यांचा नायनाट केला पाहिजे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मी हे नक्की काय पाहिलं? त्यांना काठ्यांनी बडवलं पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Foreign woman tourist harassed on manali street cctv video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Foreign Tourist
  • Himachal Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
2

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.