(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक इथे नको ते प्रकार करताना दिसून येतात. याचबरोबर इथे बऱ्याचदा लग्नसमारंभातीलही अनेक घटना शेअर केल्या जातात. लग्नसोहळा म्हटलं की त्यात अनेक नवनवीन प्रकार घडून येतात, इथे असे अनेक मजेदार किस्से घडतात जे आपल्याला हसू अनावर करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमच्या तोंडावर हसू तर आणतील पण तुम्हाला आश्चर्याचा धक्काही देऊन जातील. चला यात घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात लग्नमंडपातील काही दृश्ये दिसून येत आहेत. वर आणि वधू आपल्या आसनावर बसलेले असतात, त्यांच्या आजूबाजूने काही पाहुणे मंडळी जात असतात मात्र याचवेळी अचानक वधूचे आसन मागे घसरते आणि या आसनासह वधू देखील खाली पडते. वधूला असे अचानक पडल्याचे पाहुणे सर्वजण तिच्या मदतीसाठी जातात मात्र यात लक्षवेधी ठरते ती नवऱ्या मुलाची रिॲक्शन आपली बायको खाली पडली आहे हे कळून सुद्धा नवरा मुलगा जागचा हलत नाही आणि गप्प आपल्या आसनावर बसून राहतो. नवऱ्याचे हे कृत्य पाहून वर्हाडी मंडळीच काय तर आता सोशल मीडिया युजर्सनाही धक्का बसला आहे तर काहींना हे दृश्य पाहून हसू अनावर झाले आहे. आपल्या बायकोला वाचवण्यासाठी नवऱ्याने काहीच केले नाही, साधी तिला बघायलाही तो गेला नाही ही बाब अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली.
घटनेचा व्हिडिओ @made_in.marathi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भाऊला काय फरक पडत नाही’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत तर काहींनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ ला हुंडा कमी भेटला वाट्ट” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या भाऊ ला तिच्या सोबत लग्नं नव्हता कळायचा मनून शांत आहे तो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.