(फोटो सौजन्य: X)
अनेकदा असे घडते की, आपण करायला एक जातो पण घडत भलतंच. अशीच एक घटना सध्या एका मुलीसोबत घडली आहे जिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक मुलगी आपली माणुसकी दाखवत माकडाची मदत करू पाहते मात्र ही मदत पुढे एक भीषण रूप घेते, जे पाहून सर्वच डोक्याला हात लावतात. माकडासोबत अशी घटना घडून येते की ते पाहून मुलगीही आपल्या निर्णयावर पाश्च्याताप करू लागते. यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये, मुलगी एका डोंगराळ भागात उभी आहे जिथे पाऊस पडत आहे. माकडाला असे पावसात भिजताना पाहून मुलीला वाईट वाटते आणि ती आपली छत्री त्याला देऊ करते. माकड ही छत्री घेतो खरा मात्र पुढच्याच क्षणी इथे जोरदार हवा येते आणि वाऱ्याच्या या प्रवाहात माकड छत्रीसह अवकाशात उडून जातो. एखाद्या पॅराशूटप्रमाणे माकड ही छत्री हातात घेऊन अवकाशात झेप घेतो आणि मुलगी दुरूनच हे दृश्य पाहून आपल्या निर्णयावर खंत व्यक्त करू लागते. हे दृश्य पाहून मुलीचे नशीब खरंच किती खराब आहे याची प्रचिती येते. लोकांना हे दृश्य पाहून आता मुलीच्या नशिबावर दया आली आहे तर काहींना या दृश्यांनी खळखळून हसवले आहे.
Karm karne jati hu,
Kaand ho jate hain🥴 pic.twitter.com/kxO2BkMY51— HIMANI_RAJPUT🌼 (@Rajputhimani_S9) May 30, 2025
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही लोक या व्हिडिओला एआय द्वारे तयार केलेला व्हिडिओ मानत आहेत, तर काही लोक याला खरं मानत आहेत. या घटनेचा व्हिडिओ @Rajputhimani_S9 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी याला आतापर्यंत पाहिले असून हजारोंनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हा एआय व्हिडिओ आहे ना” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कुठे उडवून टाकलं बिचाऱ्याला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असे कर्म करू नको, नाहीतर दुसऱ्याचा क्रिया कर्म होऊन जाईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.