(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज नेहमीच आपल्या कल्पनेपलीडचे ठरतात, ज्यामुळे त्यांना पाहताच आपल्या थक्क व्हायला होते. अकस्मात घटनांचेही बरेच व्हिडिओ इथे शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो स्वित्झर्लंडच्या व्हॅलेस कॅन्टनमधील ब्लॅटनमधील आहे. वास्तविक २८ मे रोजी येथे एक दुर्दैवी घटना घडून आली ज्यात हिमनदीचा एक भाग अचानक कोसळला. हिमनदी कोसळल्यामुळे भूस्खलन झाले. बर्फ, चिखल आणि खडकांच्या प्रचंड पुरामुळे गावावर प्रचंड कहर झाला आणि वाटेत येणारे सर्व काही वाहून गेले. ही घटना आता कॅमेरात कैद करण्यात आली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. लोक यातील भीषण दृश्य पाहून हादरले आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेत असलेल्या ब्लॅटन गावात एका भयानक नैसर्गिक आपत्तीने कहर केला. “द वेदर चॅनल” च्या अहवालानुसार, हिमनदी कोसळल्याने झालेल्या विध्वंसाचे दृश्य स्पष्टपणे दिसून येते. ड्रोन फुटेजमध्ये ब्लॅटन गावाचा बराचसा भाग चिखल, खडक आणि बर्फाच्या जाड थराने झाकलेला दिसत होता. दिलासादायक बाब म्हणजे सुमारे ३०० लोकांना आधीच सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रज्ञांनी १९ मे रोजीच ब्लॅटन गाव रिकामे करण्याचे आदेश दिले होते. शास्त्रज्ञांना डोंगरात भेगा दिसल्या होत्या आणि त्यांनी हिमनदी घसरण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, ब्लॅटनचे महापौर मॅथियास बेलवाल्ड पत्रकार परिषदेत भावनिक झाले आणि म्हणाले, “आम्ही आमचे गाव गमावले, ते आता ढिगाऱ्यात गाडले गेले आहे, पण आम्ही ते पुन्हा बांधू.”
स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्ष करिन केलर-सटर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्थानिकांप्रति शोक व्यक्त केला आणि म्हटले, “तुमचे घर गमावणे अत्यंत दुःखद आहे.” प्रशासनाने खोऱ्यातील मुख्य रस्ता बंद केला आहे आणि लोकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये घडून आलेली ही घटना संपूर्ण जगासाठी एक चिंताजनक परिस्थिती आहे. या घटनेवरूनच आपल्याला हवामान बदलाविरुद्ध ठोस पावले उचलली नाहीत तर अशा आपत्ती विनाशकारी ठरतील हे स्पष्ट होते. स्विस पर्यावरण शास्त्रज्ञ ख्रिश्चन ह्यूगेल यांचा असा विश्वास आहे की ही आपत्ती पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे झाली होती, ज्यामुळे पर्वत कमकुवत झाला होता. गेल्या शतकात आल्प्स पर्वतरांगांनी इतका विनाश याआधी कधीही अनुभवला नाही.
A huge mass of rock and ice from a glacier thundered down a Swiss mountainside, sending plumes of dust skyward and coating with mud nearly all of an Alpine village that authorities had evacuated earlier this month as a precaution. pic.twitter.com/VF3S2JqYpb
— The Associated Press (@AP) May 29, 2025
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @AP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सच्या व्युज मिळाल्या असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मजेदार गोष्ट – या स्लाईडचे वजन अंदाजे १४ वर्ल्ड ट्रेड सेंटर टॉवर्स इतके होते (२००१ मध्ये) ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सार्वजनिक ठिकाणी तोडफोड होण्यापूर्वीच यंत्रणा शांतपणे अपयशी ठरतात. स्वित्झर्लंडने नुकतेच दाखवून दिले की निराकरण न झालेले दबाव कशात बदलते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.