VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी? (फोटो सौजन्य: एक्स)
क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, इराकमध्ये एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या रेडदरम्यान अधिकाऱ्यांनी खासदाराच्या घरातून मोठ्या प्रमाणात २७ किलोचे सोने जप्त केले आहे. तसेच ५७ मिलियन डॉर्लसही मिळाली आहे. सर्वात खळबळजनक म्हणजे या रेडमध्ये सोन्यात बनवलेली ब्रा आणि रत्नजडित बिकनी ही जप्त करण्यात आली आहे.
या बिकनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. व्हायरल पोस्टनुसार, इराकच्या खासदार हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर रेड मारण्यात आली आहे. यासोबत काही फोटोही जप्त करण्यात आले आहेत. तसेच हिंद अल-अब्बासी यांना अटक झाल्याचीही चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे. हे फोटो, सोन्याची ब्रा, रत्नजडित बिकनी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
इराकच्या गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ रोजी इराकमध्ये भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान एका खासदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी सुमारे १५.५ दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक जास्त रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले आहे.
अधिकृत माहितीनुसार, ही कारवाई खासदार अलिया नसिफ यांच्या घरावर करण्यात आली आहे. हिंद अल-अब्बासी यांच्या घरावर नाही. तसेच सोन्याची ब्रा, रत्नजडित बिकनी, सोने जप्त केल्याच्या दाव्याबाबत इराकच्या सरकारकडून किंवा इतर विश्वासार्ह माध्यमांकडून अद्याप याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची पडताळणी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होते.
सोशल मीडिया पर इन दिनों एक ऐसी तस्वीर का दावा वायरल हो रहा है जिसने सभी लोगों को आश्चर्यचकित कर दिया है यह दवा भ्रष्टाचार विरोधी छापेमारी से संबंधित है जहां लगभग 490 करोड रुपए 27 किलो सोना और सोने से बनी ब्रा और पैंटी 👙बरामद हुई है इसके बाद सोशल मीडिया पर बवाल मचा हुआ है और… pic.twitter.com/LCf63cIF2L — Shailesh Verma (@shaileshvermasp) July 2, 2026
धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral
टीप – हे व्हिडिओ, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






