सध्या दरोडा, चोरी आणि लुटमारीच्या घटना या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. चोरी करणं गुन्हा असलं तरी आजकाल बहुतेक लोक झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी या मार्गाची निवड करतात. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी आणि दागिन्याच्या दुकानांमध्ये अशा घटना सर्रास घडल्याचे दिसून येते. सध्या अशाच एका दागिन्यांच्या दुकानातील चोरीचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चोर बंदुकीचा धाक दाखवत दुकान लुटण्याच्या उद्देशाने दुकानात तर शिरतात मात्र यांनतर त्यांच्यासोबत जे घडते ते पाहून आता प्रत्येकजण त्यांच्या फजितीची मजा लुटत आहे. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसू लागाल.
काय आहे प्रकरण?
सदर चोरीची घटना ही हरियाणाच्या फरिबादमध्ये घडल्याचे समोर आले आहे. यानुसार 14 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अशोका एनक्लेव्ह बाजारातील दागिन्यांच्या एका दुकानात बंदूक घेऊन दोन चोर शिरले. त्यांनी प्रथम दुकानातील सुरक्षा कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत दुकानाच्या आत आणले. हे सर्व दृश्य पाहून दुकानातील इतर कर्मचारी आणि ग्राहक घाबरले. मात्र विशेष म्हणजे, यावेळी दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांनी हिम्मत दाखवली आणि त्यांनी चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते चोरांना आपल्या तावडीत अडकवण्याचा प्रयत्न करू लागते मात्र आता आपले काही खरे नाही हे समजतच चचोरांनी तिथून उलटे पाय धरले आणि दुकानातून पळून गेले. त्यावेळी चोरांची झालेली बिकट अवस्था पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अशाप्रकारे दुकानातील कर्मचाऱ्यांनी मिळून आपले दुकान चोरांच्या तावडीतून लुटण्यापासून वाचवले. त्यांच्या या धैर्याचे आता सोशल मीडियावर फार कौतुक केले जात आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या मदतीने चोरांचा शोध घेत आहेत.
Masked Thieves Attempt to Rob Faridabad Jewellery Store, Owner Fights Back, Faridabad
pic.twitter.com/gJgIjBqtM9 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 17, 2024
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
चोरीचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मुखवटा घातलेल्या चोरट्यांचा फरीदाबाद ज्वेलरी स्टोअर लुटण्याचा प्रयत्न, मालकाशी भांडण, फरिदाबाद’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मालकापेक्षा सुरक्षा रक्षक अधिक घाबरतो आणि समानतेचे उदाहरण पुन्हा पाहायला मिळते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मालकाचे धाडस वाखाणण्याजोगे! अशा चोरांविरुद्ध लढणे सोपे नाही, परंतु कठीण काळात आपल्याला अशाच शौर्याची गरज आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






