आजकाल बऱ्याच लहान सहन गोष्टींवरून लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. अनेकदा शाब्दिक बचावाचीतून सुरु झालेले हे वाद वेगळ्याच वळणावरून जाऊन पोहचतात. कधी कधी या वादाचे रूपांतर मारामारीत होते. वादाच्या भोवऱ्यात लोक इतके वेडे होतात की एकमेकांच्या जीवाचे बरेवाईट करायलाही मागेपुढे बघत नाही. सोशल मीडियावर असे मारामारीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक घटना व्हायरल व्हिडिओत घडताना दिसून येत आहे. यात शाळकरी मुली भररस्त्यात एकमेकींच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला यांच्यात कडाक्याचं भांडण होत आणि मग या भांडणाचे रूपांतर मारामारीत होत. आता नेमकं या मुलींमध्ये काय घडलं याविषयी चला सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये जसे की तुम्ही पाहू शकता, एक तरुणी आपल्या आईसोबत स्कुटीवर बसून आपल्या इच्छित ठिकाणी जाण्याच्या तयारीत असते. मात्र स्कुटर सुरु करण्यापूर्वीच तिथे काही विद्यार्थीनी येतात. या मुली घोळाखा घालून तिथे येतात आणि स्कुटरवर बसलेल्या तरुणीशी वाद घालायला सुरुवात करतात. या भांडणात स्कूटरवर बसलेल्या विद्यार्थीनीची आई मध्ये पडते आणि बोलू लागते. मात्र मुली काही ऐकायला बघत नाहीत. तितक्यात काही वेळाने तिची आई स्कूटर सुरू करू पाहते आणि मग जे घडते ते पाहून तुम्ही आवाक् व्हाल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
स्कूटर सुरू करून थोड्या अंतरावर जाताच घोळक्यामधील एक विद्यार्थीनी मागे बसलेल्या मुलीला चालू स्कुटीवरून खेचते आणि तिला रस्त्यावर खाली पाडते. यामुळे तिची आई घाबरून गाडी लगेच थांबवते. आपल्याला रस्यावर पडल्याचे पाहून तरुणीला भयंकर राग येतो आणि ती मुलींना मारण्यासाठी पुढे जाते. बाकी मुलीही यावेळी मागे होत नाहीत आणि भररस्त्यात मुलींचा राडा सुरु होतो. एकमेकींचे केस पकडत मिली एकमेकींना हाणू लागतात. या वादामुळे तिथे गर्दी जमा होते आणि लोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. कशीबशी तिची आई तिच्या मुलीला यातून सोडवते. विशेष म्हणजे, या घटनेवेळी समोरच एक व्यक्ती हे सर्व दृश्य जवळून बघत असतो मात्र तो हे भांडण सोडवायला येत नाही आणि मजा घेत मुलींमधील मारामारी बघत राहतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मुलींमधील या मारामारीच्या व्हिडिओ @mantho_easykadu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 27 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काका खूप अनुभवी आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलींच्या केसमध्ये पडलो तर कोणता ना कोणता कायदा मध्ये येईल, असं काकांना वाटलं असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






