फोटो सौजन्य - सोशल मिडिया
BCCI on IND vs PAK match suspense : 2026 च्या T20 विश्वचषक सुरू झाला आहे. दमदार सामने मागील दोन सामन्यामध्ये पाहायला मिळाले आहेत, आज या विश्वचषकाचा तिसरा दिवस आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी अनेक वाद पाहायला मिळाले आहेत. भारत आणि पाकिस्तान या सामन्याबद्दल मागील काही दिवसांपासून वाद झाले आहेत. पाकिस्तान भारताविरूद्ध होणारा सामना बाॅयकाॅट करणार असे त्यांनी सोशल मिडियावर अधिकृत घोषणा केली आहे. 2026 च्या T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याभोवती सस्पेन्स कायम आहे.
पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. आता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सामन्याचे आयोजन करण्याच्या शक्यतेबद्दल ICC सोबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचे वृत्त येत आहे. दरम्यान, त्यांनी ICC समोर काही अटी ठेवल्या आहेत. PCB च्या या युक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर, BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपले मौन सोडले आहे.
दिल्लीतील पुढील सामन्यापूर्वी, टीम इंडियाचे सर्व सदस्य गौतम गंभीरच्या घरी जेवणासाठी गेले होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील उपस्थित होते. माध्यमांनी त्यांना विचारले की पाकिस्तानने सामन्याचे वेळापत्रक बदलण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत का? शुक्ला उत्तर दिले, “मी यावर भाष्य करणार नाही. बीसीसीआय या विषयावर भाष्य करू इच्छित नाही. आता सर्व काही आयसीसीवर सोपवण्यात आले आहे. आयसीसी जे काही निर्णय घेईल ते आम्ही स्वीकारू. आयसीसी जे काही सांगेल ते आम्ही स्वीकारू. आम्ही सर्व काही त्यांच्यावर सोपवले आहे.”
#WATCH | Delhi | On Pakistan to boycott its match against India in the ICC Men’s T20 World Cup 2026, BCCI Vice-President Rajeev Shukla says, “…We have left everything on the ICC. We will follow whatever decision the ICC takes” pic.twitter.com/jfuy4exO7v — ANI (@ANI) February 8, 2026
आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामने खेळण्याबाबत आयसीसीसमोर काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. क्रिकबझच्या वृत्तानुसार, पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वार्षिक उत्पन्नात वाढ करण्याची मागणी केली आहे. शिवाय, त्यांना पुन्हा भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळायची आहे.
आशिया कपमध्ये भारताने हात न मिळवण्याचा नियम पाळला. पीसीबीने दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावे अशी मागणी केली आहे. आतापर्यंत आयसीसीने या अटींवर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. पीसीबीच्या मागण्या पूर्ण होतात की नाही हे काही दिवसांत स्पष्ट होईल.






