कुत्रा हा प्राणी जरी तितकासा धोकादायक वाटत नसला तरी कुत्र्यामध्येही काही प्रजाती असतात, ज्यानुसार त्यांच्या ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो. पिटबूल प्रजातीचे कुत्रे हे सर्वात धोकादायक मानले जातात. इंटरनेटवर पिटबूलचे अनेक कारनामे व्हायरल झाले आहेत, यातून तुम्ही तो किती धोकादायक आहे याचा अंदाज लावू शकता. सध्या पिटबूलचा असाच एक थरारक कारनामा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे.
हा बिबट्या खरंतर पिटबूलची शिकार करायला आला होता मात्र घडलं काहीतरी भलतंच. उलट शिकार करण्यासाठी आलेल्या शिकाऱ्याची शिकार झाली. पिटबुल्याने अक्षरशः बिबट्याला हैराण करून सोडलं, त्याने बिबट्यावर असा हल्ला चढवला की पाहून बिबट्या देखील हादरला. दोघांमध्ये झालेल्या या जीवघेण्या लढतीचा व्हिडिओ पाहून आता युजर्स आवाक् झाले आहेत. मुळात बिबट्याला जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानले जाते. अशात बिबट्याची एका श्वानाने केलेली शिकार पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे व्हिडिओत?
सदर घटना ही जयपूरमध्ये घडली आहे. तर झालं असं की, सकाळी पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशाने गावात घुसला. तेवढ्यात त्याला घरासमोर एक कुत्रा बसल्याचे दिसून आले. मग काय बिबट्याने कुत्र्याला कमी लेखले आणि नको ते घडून बसले. शिकार करण्याच्या उद्देशाने बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवला पण हा काय साधासुधा कुत्रा नाही तर पिटबूल प्रजातीचा बिबट्या होता ज्याने बिबट्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि पिटबूल कुत्र्याने बिबट्याला अक्षरशः झोडपून सोडलं. दोघेही एकमेकांना बरोबरीची झुंज देतात. यात दोघेही जखमी होतात आणि शेवटी शिकाऱ्यालाच आपले प्राण वाचवण्यासाठी येथून पळ काढावी लागते.
#लेपर्ड पर भारी पड़ा कुत्ता…
लेपर्ड ने आसान समझ अटैक किया।
कुत्ते की धोबी पछाड़ से भागना पडा।
#Jaipur #CCTV pic.twitter.com/fgsTrk9DgT — Bhawani Singh (@BhawaniSinghjpr) November 16, 2024
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पिटबूल आणि बिबट्यातील या थरारक लढतीचा व्हिडिओ जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून आता तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ @BhawaniSinghjpr नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत या थरारक लढतीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “नशीब चांगले होते कुत्र्याचे…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप धाडसी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






