(फोटो सौजन्य: Twitter)
जंगलाचा राजा सिंह असू शकतो, पण चपळाईच्या बाबतीत वाघाची बरोबरी कुणाशीही करता येत नाही. वाघाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर होत असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यात एका वाघाने विशालकाय बैलाची शिकार केल्याचे समजते. हे दृश्य मध्य प्रदेशातील पन्ना येथील असून याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे या शिकारीसाठी वाघाला फार काळ लागत नाही क्षणातच तो ही शिकार करून मोकळा होतो.
पन्ना टाइगर रिजर्मधून वाघाचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये वाघ बैलाची शिकार करताना दिसत आहे. त्याचवेळी पर्यटकांची जिप्सी तिथे पोहोचते आणि पर्यटक हे संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. हेच दृश्य आता सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून आता ते वेगाने व्हायरल होत आहे. यात नक्की काय आणि कसे घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
वाघाची शिकार केल्यानंतर बैलाला ओढत नेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुम्ही नीट पाहिले तर यात दिसेल की, सुरुवातीला बैल वाघाला पकडत त्यावर नियंत्रण मिळवण्याचा आणि त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो खरा पण क्षणातच ते संपूर्ण दृश्य बदलते आणि वाघ बैलावर भारी पडतो. तो बैलाच्या मानेवर चावा घेतो आणि क्षणातच त्याला मारून टाकतो. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला वाघ बैलाचे शरीर खेचून नेत असताना दिसून येईल. काही सेकंदांचाच हा थरार आता अनेकांचे होश उडवत आहे.
Amazing #Panna
Raw Nature. pic.twitter.com/9CwcSqGpB0— WildLense® Eco Foundation 🇮🇳 (@WildLense_India) February 20, 2025
वाघाच्या या शिकारीचा थरार @WildLense_India नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेक युजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हेच निसर्ग आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाईट वाटले! त्यांनी गायींची हत्या करू नये! त्यांची नैसर्गिक शिकार नाही. वन्यजीव उद्यानांच्या जवळ असलेल्या मानवी वस्त्या याला कारणीभूत आहेत. आपण हे कसे थांबवणार आहोत हे देवालाच माहीत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.