फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक विचित्र व्हिडिओ आणि घटना पाहायला मिळत आहे. तेलंगणातील सूर्यापेट येथील क्रांती कुमार पनिकेरा या तरुणाने आपल्या अनोख्या कामगिरीने जगभरातील लोकांना अचंबित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने एका मिनिटात 57 इलेक्ट्रिक पंखे थांबवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे.
या अनोख्या कामगिरीचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोशल मीडियावर शेअर केला असून तो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. क्रांती कुमार यांना “ड्रिल मॅन” या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी ही कामगिरी अविश्वसनीय वेग आणि कौशल्याने पार पाडली. त्यांच्या जीभेच्या फिरणारे पंखे थांबवण्याचे अनोखे टॅलेंट पाहून लोक आश्चर्यात पडले आहेत. मात्र, असे विचित्र काम जीवावर बेतण्याची देखील शक्यता आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या कार्यक्र सुरु असून एका लाईनमध्ये अनेक काळ्या रंगाचे पंखे उभे करुन ठेवले आहेत. पंखे सुरु असून एक व्यक्ती आपल्या जीभेन पंखे थांबवत आहे. हा व्हिडिओ पाहताना लक्षात येते की, हे किती धोकादायक असून शकते. पंख्याच्या पाती चेहऱ्यावर लागू शकतात किंवा विजेचा झटका देखील लागून शकतो. पण ही कतामगिरी करणाऱ्याला कशाचीच भीती वाटत नसून तो एकामागून एक पंख्यांना जीभ लावून थांबत आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Most electric fan blades stopped using the tongue in one minute 👅 57 by Kranthi Drillman 🇮🇳 pic.twitter.com/dsH8FULHxW
— Guinness World Records (@GWR) January 2, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत 14.7 दशलक्ष व्ह्यूज, 23 हजार लाईक्स आणि असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर लोकांनी क्रांती यांच्या या अजब कर्तबगारीचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, “अशी ट्रेनिंग मिळते का?” दुसऱ्या एकाने, “आयर्न टंग.” असे म्हटले आहे. आणखी एकाने कमेंट केली आहे की, “एलॉन मस्कला अशाच कुशल कामगारांची गरज आहे.” काहींनी याला विनोदी शैलीत घेतले आहे. मात्र, काहींनी याला मूर्खपणाचे लक्षण म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा