(फोटो सौजन्य: X)
एसी बंद झाल्याने प्रवासी भडकले
मिळालेल्या माहितीनुसार, ही फ्लाईट २.४० वाजता उड्डाण भरणार होती पण टेकऑफआधीच काही तांत्रिक बिघाड झाल्याने रनवेवरच विमानाला अनेक तास थांबवून ठेवण्यात आले. विमान थांबले पण प्रवाशांना मात्र यातून बाहेर सोडले नाही ज्यामुळे सर्व प्रवासी विमानातच अडकून राहिले. यादरम्यानच विमानाचा एसीदेखील अचानक बिघडला ज्यामुळे विमानाच्या आत उकाड्याने प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला. दिल्लीच्या दमट आणि भाजून काढणाऱ्या उन्हात, एसीशिवाय विमानाची केबिन भट्टीसारखी गरम झाली. विमानात असलेली लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि महिलांची अवस्था बिकट झाली. हवेसाठी प्रवाशांना विमानात ठेवलेल्या मासिकांचा वापर करावा लागला. या सर्वच प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले आणि विमानाच्या आत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी सांगितले की, त्यांना विमानाच्या आत श्वास घेणं देखील कठीण झालं होतं, लहान मुले रडत होती परंतु विमानातील स्टाफ त्यांनी विमानाबाहेर जाऊ देत नव्हता.
कल दिल्ली से रांची जा रही इंडिगो फ्लाइट 6E-2614 में यात्रियों का आरोप है उन्हें करीब एक घंटे तक बिना एसी के विमान में बैठाए रखा बंद केबिन में बुजुर्ग और बच्चे गर्मी से बेहाल हो गए,विमान में ठंडक और हवा न होने से लोगों का दम घुटने लगा। pic.twitter.com/cnpHHEHffB — Naseem Ahmad (@NaseemNdtv) June 27, 2026
प्रवाशांनी क्रू-मेंबर्ससोबत केले भांडण
बऱ्याच काळात जेव्हा काहीच मदत मिळाली नाही तेव्हा प्रवासी रागाने भडकले आणि त्यांनी आपला सर्व राग क्रू-मेंबर्सवर काढायला सुरुवात केली. संतप्त प्रवाशांनी विमानात गोंधळ आणि आंदोलन सुरू केले. विमानात बिघाड होताच त्यांना टर्मिनलवर परत का पाठवण्यात आलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रवाशांचा आक्रोश पाहता अखेर काही तासाने विमानाने दरवाजे खुली केली आणि बसच्या मदतनीने सर्व प्रवाशांना टर्मिनलर परत पाठवण्यात आले. तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीनंतर आणि तपासणीनंतर विमानाने काही तासांनंतर उड्डाण भरले. हे विमान संध्याकाळी ४.३५ वाजता रांचीला पोहचणार होते पण या सर्व गोंधळामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे ते ८.१५ वाजता रांचीत पोहोचले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






