फोटो सौजन्य - Social Media
पती पत्नी मध्ये होणार वाद तर सामान्यच असतो आणि ते घराघरात होत असत. यात काहीच नवल नाही पण सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारी एक घटनेने सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले आहे, कारण गोष्टच अशी घडली आहे. दिवसेंदिवस घटस्फोटाच्या अनेक बातम्या समोर येत असतात. आज या अभिनेत्याचा घटस्फोट झाला, उद्या त्या क्रिकेटरचा घटस्फोट होणार. स्टार्स लोकांसाठी या चर्चा तर आता सामान्यच झाल्या असतील. तसे घटस्फोट होणे पाहायला गेले तर सामान्यच गोष्ट आहे, कारण रोज असे कित्येक घटस्फोट होत असतात. पण त्या घटस्फोटामध्ये पती पत्नी काही वर्षतरी सोबत राहिलेले असतात. चला, वर्ष सोडा, पण काही महिन्यांसाठी तरी एकत्र असतात. मग त्यांच्यात वाद होतो आणि ते वेगळे होतात.
सध्या सोशल मीडियावर अशा लग्नाची गोष्ट प्रसिद्ध होत आहे. ज्या लग्नाची कहाणी सुरु होताच संपली. त्या दोघे पती पत्नीचा संसार फक्त ३ मिनिटांचा होता. लग्न होऊन पत्नीने ३ मिनिटांत तिच्या पतीला घटस्फोट दिला. या मागे, कारणही तसे होते. लग्न कोर्टात लागत होते. लग्न चांगल्या पद्धतीने पार पाडले. पण नंतर पत्नीच्या पडल्याने, नवरदेव जोरजोरात हसायला लागला आणि इतकेच नव्हे तर पट्ठ्याने तिला मूर्खसुद्धा म्हटले. आता म्हणतात, जैसी करणी वैसी भरणी! जरा तोंडावर ताबा ठेवला असता तर सगळ्यात कमी वेळ टिकलेले लग्नातील नवऱ्याचा टॅग तरी माथ्याला लागला नसता. पत्नीला आला राग आणि जागीच पतीला घटस्फोट देऊन टाकला.
अशाच प्रकार २००४ साली, लंडनमध्ये घडला. वऱ्हाडी मंडळी जमली, लग्नपण पार पडलं. पण नवरदेव बायकोच्या मैत्रिणींना टोस्ट वाटताना पाहून बायकोला आला राग आणि लग्नाच्या अवघ्या ९० मिनिटांनंतर तिने पतीला घटस्फोट दिला.