प्रारंभी तिच्या हालचालींवर वनविभागाचे पथक बारकाईने लक्ष ठेवून होते. दरम्यान, वारणा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तिचा प्रवेश झाला. हा परिसर मगरींच्या वावरासाठी ओळखला जातो. मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा, खोल पाणी आणि मगरींचा धोका पाहता हा भाग कोणत्याही वन्यप्राण्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. अशा परिस्थितीत ताराने घेतलेला निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला. वारणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तिने तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न थांबता पोहत पार केले. या संपूर्ण घटनेदरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली होती. जीपीएस कॉलरच्या माध्यमातून तिच्या हालचालींचे निरीक्षण सुरू होते.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वाघ सहसा मोठ्या जलाशयातून लांब पल्ल्याचे पोहणे टाळतात. मात्र, योग्य परिस्थितीत आणि गरज भासल्यास वाघ उत्कृष्ट पोहणारे प्राणी असल्याचे ताराने सिद्ध केले, मगरीचा धोका असतानाही तिने दाखवलेले धैर्य आणि शारीरिक क्षमता दुर्मिळ मानली जात आहे. ताराच्या या साहसामुळे सहाादी व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळाली आहे. जंगलात मुक्तपणे वावरणाऱ्या वाघिणीची ही घटना मानवी हस्तक्षेपाशिवाय निसर्गात जगण्याची ताकद दाखवणारी ठरली आहे. ताराचे हे थरारक साहस केवळ एक घटना न राहता, व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.
सह्यादी व्याघ्र प्रकल्पात ताडोबा येथून आणलेल्या ‘तारा’ला ९ डिसेंबर रोजी सहह्यादी व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. १८ डिसेंबरला ती विलग्न वासाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून अधिवासाच्या शोधात बाहेर पडली, १९ डिसेंबर रोजी चांदोली वनक्षेत्रातील वारणा धरणाच्या बैंकवॉटरपाशी ती आली. त्याठिकाणी ती बराच वेळ बसली, सायंकाळी सहा वाजता तिने धरणाच्या पाण्यात उडी मारली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांना वाटले काहीवेळ पाण्यात राहिल, मात्र तारा थाबलीच नाही, दोनशे मीटर गेल्यावर तिने डाव्या बाजूला वळून झोळवी परिक्षेत्रात प्रवेश केला.
जंगल क्षेत्रात वनविभागाने नुकतेच १०० चितळ सोडले आहेत, त्यांच्या आवाजामुळे तारा या शिकारीच्या क्षेत्राकडे आपल्या हद्दीचा अंदाज घेण्यासाठी ताराने हा धाडसी प्रवास केला. या भागात सोडलेल्या चितळांचा वावर आणि चंदा वाघिणीच्या खुणा यामुळे ती भक्ष शोधण्यासाठी या परिसरात आली असावी. तिच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे, असे तुषार चव्हाण क्षेत्रसंचालक, सह्यादी व्याघ्र राखीव प्रकल्प यांनी सांगितले.
वारणा धरणाच्या या क्षेत्रात मोठ्या मगरींची संख्या जास्त असल्याने वनविभागाच्या मनात तिच्या सुरक्षिततेबाबत धाकधूक होती. मात्र, ताकदवान ताराने सर्व संकटांवर मात करत झोळंबी परिक्षेत्रात यशस्वी प्रवेश केला. विशेष म्हणजे, तिच्या गळ्यातील रेडिओ कॉलर पाण्याखाली असतानाही उत्तमरीत्या काम करत होती, ज्यामुळे वनविभागाला तिच्या प्रत्येक हालचालीची अचूक नोंद घेता आली. ताराने पाणी पार केल्यानंतर केवळ विश्रांती घेतली नाही, तर त्याच रात्री झोळंबी कोअर झोनमध्ये शिकारही केली. सध्या तिचे वास्तव्य ढेबेवाडी बफर झोनमध्ये आहे.
Ans: तारा वाघिणीने वारणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तब्बल दीड किलोमीटर अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पोहत पार केले, तेही मगरींचा धोका असलेल्या परिसरातून. हे साहस अत्यंत दुर्मिळ आणि थरारक असल्याने ती चर्चेत आहे.
Ans: ताराला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आहे.
Ans: ताराला ९ डिसेंबर रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.






