किंग कोब्रा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. तो आपल्या शिकारीसाठी विशेष करून ओळखला जातो. त्याच्या एका विषारी दंशाने भलेभले मृत्यूच्या दारी पोहचतात. किंग कोब्राला फक्त प्राणीच नाही तर माणसंही फार घाबरतात. याला पाहताच लोक आपली वाट बदलतात. किंग कोब्राचे अनेक थरारक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मेडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील धक्कादायक दृश्ये तुम्हाला अचंबित केल्याशिवाय राहणार नाहीत.
काय आहे व्हिडिओत?
तुम्ही अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण तर लहानपणी नक्कीच ऐकली असावी. सध्या याचीच प्रचिती देणारी घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक काका किंग कोब्राला आपल्या समोर बसवून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. यावेळी ते कोब्राच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे एकटक पाहत आहेत. मात्र प्राण्यांची मस्ती कधीही करू नये तेच खरे. शेवटी नको तेच घडते आणि क्षणार्धात हा कोब्रा त्याच्यावर वार करतो. यावेळी तो त्या काकांच्या थेट डोळ्यावरच आपला फणा काढून दंश मारतो.
हेदेखील वाचा – पोलीस आहे म्हणत एकट्या तरुणीला करत होता ब्लॅकमेल, तरुणीने दाखवली हुशारी, केलं असं की… Video Viral
हे काका बराच वेळ सापाकडे एक टक पाहात होते. दरम्यान साप बिथरला आणि त्याने थेट त्यांच्या डोळ्यांवर वार केला. यानंतर पुढे काय झालं हे वेगळं सांगायला नको. सापाचा दंश काही सामान्य बाब नाही. यानंतर त्या काकांच्या डोळ्यांना नक्कीच मोठी इजा झाली असणार. डोळ्यांसारख्या नाजूक ठिकाणी सापाचं विष जाणं ही फार भयंकर बाब आहे. त्यांचं पुढे काय झालं व्हिडिओत सांगण्यात आली नाही. मात्र हा काही सेकंदाचा थरार पाहून युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा – बिल्डिंगच्या खोलीत राहण्यासाठी तरुण देतो फक्त 15 रुपये भाडे, फोटो शेअर करताच सर्व झाले चकित
हा व्हायरल व्हिडिओ @therealtarzann नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 1.5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला वेदना जाणवत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी मोठ्याने ओरडलो OMG” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असे वाटते या व्यक्तीचे यमराजसोबत उठणं बसणं आहे”.