(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलाचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे. आपल्या बलाढ्य शक्तीने आणि साहसाने संपूर्ण जंगलात फक्त आणि फक्त त्याचीच दहशत असते. अहो, मोठेमोठे प्राणी त्याच्यापुढे झुकतात असा हा सिंह आपल्या कारकिर्दीत अनेकांचा फडशा पाडतो. सिंह जगातून कमी होत असले तरी त्यांची दहशत अजूनही कायम आहे. हा असा एकमेव प्राणी जो जगतो राजासारखा आणि मारतोही राजासारखाच… आजवर आपण सिंहाच्या शिकारीचे अनेक थरार सोशल मीडियावर पाहिले आहेत मात्र जेव्हा तो मारतो तेव्हा काय होत तो कसा मारतो हे तुम्ही पाहिले आहे का? केनियातील एका प्रसिद्ध सिंहाचा मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो निसर्गाच्या कुशीत झोपून आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेताना दिसून आला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक सिंहाचे मृत्यपूर्वीचे रूप पाहून थक्क झाले आहेत.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केनियातील मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्यातील आहे. स्कार्फेस हा तेथील प्रतिष्ठित आणि सुप्रसिद्ध असा नर सिंह होता. स्कार्फेसचे ११ जून २०२१ रोजी वयाच्या १४ व्या वर्षी निधन झाले. तो आफ्रिकन सवानाच्या शक्ती, लवचिकता आणि वन्य सौंदर्याचे प्रतीक होता. त्याच्या मृत्यूआधीचे काही क्षण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, हा तोच सिंह आहे ज्याने ४०० हायफनची शिकार केली, ३०० नर सिंहांचा संहार केला, हा एकमेव असा सिंह होता ज्याने भल्यामोठ्या पाणघोड्याची शिकार केली, मगरीला तिच्या राज्यात जाऊन ज्याने त्याची शिकार केली हा तोच जंगलाचा राजा आहे ज्याने संपूर्ण जंगलावर आपले राज्य गाजवले आणि जीवनाच्या या शेवटी त्याच्या शरीरावरच्या सर्व खुणा त्याच्या शक्तीचे जिवंत उदाहरण देत होते. आपली जाण्याची वेळ जवळ आल्याची समजताच तो गवतावर निपचित पडून राहिला आणि त्याने शेवटची झोप घेतली.
सिंहाच्या शेवटच्या क्षणांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओला @raxak_rules नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी त्याला शेवटचा श्वास घेताना पाहिले का” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सर्वात बलवानांमध्ये सर्वात बलवान” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हाच खरा अर्थ आहे ‘किंग साईज लाईव्ह लाईफचा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.